पावसाच्या खंडामुळे पिक वाढीवर परिणाम
लातूर /प्रतिनिधी-जिल्हयात १५ दिवसाच्या उशिराने पाऊस झाल्यानंतर शेतक-यांनी पेरण्या केल्या. कांही ठिकाणी बियाणे न उगवल्यामुळे शेतक-यांनी दुबार पेरणी केली. पिके सध्या फुलो-यात व शेंगा सुटण्याच्या आवस्थेत आहेत. अशा परिस्थित जिल्हयात गेल्या महिनाभरापासून पाऊस न झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे चित्र सध्या जिल्हयात दिसून येत आहे.
लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीचे ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र आहे. पुरेशा पावसा अभावी खोळंबलेल्या खरीप हंगामातील पेरण्या जुलै महिण्या पासून सुरू झाल्या. जुलै मध्ये पडलेल्या पावसामुळे पिक परिस्थितीही बेताची राहिली. मात्र ऑगस्ट महिण्यात पावसाने उघडीप दिल्याने सध्या फुलो-यात व शेंगा सुटण्याच्या आवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाची वाढीवर परिणाम झाला आहे. जवळपास एक महिण्याच्या पावसाच्या खंडामुळे पिके सुकत आहेत. शेतकरी पिकांना वाचवण्यासाठी फवारणी, पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी महावितरणला जाग आल्याने ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विजेचे कनेक्शन तोडण्याचे प्रकार घडत आहेत. विहीर व बोरला पाणी असुनसुध्दा शेतकरी वाळत असलेल्या पिकाला पाणी देण्यासाठी महावितरण आथडळे निर्माण करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहयला मिळत आहे.
जिल्हयात आजपर्यंत ३३२.४० मिलीमिटर पाऊस झाला असून जमिनीतील ओलाव्याच्या आधारावर शेतक-यांनी ५ लाख ९२ हजार ३६९ हेक्टरवर (९९ टक्के क्षेत्रावर) पेरण्या केल्या आहेत. यात सर्वाधिक ५ लाख २ हजार ४७९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तसेच तूरीचा ६५ हजार ४६८ हेक्टर, मूग ४ हजार ४४३ हेक्टर, उडीद २ हजार ९५४ हेक्टर, ५ हजार ९७ हेक्टरवर ज्वारी, बाजरी ७४४.२२ हेक्टर, मका २ हजार ३५० हेक्टर, साळ १२०.५० हेक्टर, सुर्यफूल १७ हेक्टर, लहान कारळयाची ९० हेक्टरवर, भुईमुग २५३ हेक्टर, तर तीळाची २२७ हेक्टरवर पेरणी झाली असून कापूस ७ हजार ५३५.८० हेक्टरवर लागवड झाली आहे.
إرسال تعليق