महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खरोसा येथे रक्तदान शिबिर संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खरोसा येथे रक्तदान शिबिर संपन्न
 औसा/प्रतिनिधी-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज १५ ऑगस्ट२०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा खरोसा तालुका औसा जिल्हा लातूर च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे, औसा तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला,हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मनसेचे खरोसा विभाग अध्यक्ष शशिकांत भातमोडे,शाखाध्यक्ष दौलत जाधव, उपशाखा अध्यक्ष शिवराज सांडूर, सचिव आदित्य वाघमारे, यांच्यासह गावातील कार्यकर्ते व युवकांनी युवकांनी परिश्रम घेतले.गोपाळ सांडूर, शुभम पांचाळ,अक्षय तोडकर, श्रीकांत भातमोडे,मुरहरी शिरसागर,राहुल जाधव,सुमित पोवाडे,अभिजीत साळुंखे, आदित्य साळुंखे,प्रकाश गोरे, गोविंद शिरसागर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم