मंगळा गौर स्पर्धेत सावित्रीच्या लेकी ग्रुप - सिकंदरपूर विजेता
लातूर :- भारतीय संस्कृतीत आपल्या सण समारंभाना अनन्य साधारण महत्त्व आहे.आणि ते वैद्यकीय दृषटया ही सिद्ध झालेले आहे.प्रत्येक ऋतू मानानुसार आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाला अनुषंगानेच आपले सण आणि त्याच्या प्रथा प्रचलित आहेत. श्रावण महिन्यात तर सणांची पवृनी च असते, असाच एक सण मंगळागौर
या सणा च्या निमित्ताने घेतले जाणारे पारंपरिक खेळ म्हणजे आपल्या मनाला व शरीराला एक आगळीवेगळी ऊर्जा देणारे आहेत. पूर्वी च्या काळात महिलांना मनोरंजन साठी आजच्या सारखी साधने नव्हती, मग या खेळा च्या माध्यमातून च त्यांचे मनोरंजन व विचारांची देवाणघेवाण होत असे..,आज आपल्याला अनेक साधने मिळाली परंतु माणसामाणसातील अंतर फार वाढले...,आणि ही जी खेळ खेळन्याची परंपरा आहे ती कुठे तरी लोप पावत आहे...आपल्या पुढच्या पिढीला या चे महत्त्व समजावे व त्याचा आनंद त्यांना जाणून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कला गुणांना सादर करण्यासाठी एक हककाचे व्यासपीठ मिळवून द्यावे या उद्देशातून या स्पर्धांचे लातूर जि.प.सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या *सौ.सोनाली रमेश थोरमोटे - पाटील* यांनी *थोरमोटे लाॕन्स* येथे आयोजन केले होते....
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सर्व गावांतील महिलांना यात संधी उपलब्ध करून देण्यात आली यात सिकंदरपूर,चांडेश्वर, वासनगाव,गंगापूर,खंडापूर,पाखरसांगवी व परिसरातील अनेक ग्रुपनी सहभाग नोंदवला होता..
सदरील कार्यक्रमाचे मा.उदघाटन *सौ. स्मिता खानापूरे मॅडम* { माजी महापौर,लातूर } यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून ,*सौ.सपना किसवे* { संचालीका लातूर जिल्हा मध्यवर्ती बॕंक } *सौ. शितल फुटाणे मॅडम* { माजी सभापती पंचायत समिती,लातूर } *सौ.सोनाली थोरमोटे* { जि.प.सदस्या ,लातूर } *सौ. रेशमा गंभीरे मॅडम* { सरपंच सिकंदरपूर } *सौ.गायकवाड मॕडम* { सरपंच गंगापूर }, *सौ. माधुरी वसले मॅडम, सौ.मंदाकिनी भालके - गंभीरे मॕडम* तसेच परीक्षक *सौ. मिरा जोशी मॅडम, सौ. जोशी मॅडम, सौ. ढेले* उपस्थित होत्या...
या कार्यक्रमात अनेक महिला संघानी सहभाग नोंदविला यामधून वासनगाव व सिकंदरपूर महिला ग्रुप विजेते ठरले.....
सिकंदरपूरच्या सावित्रीच्या लेकी ग्रुप मध्ये ग्रुप लिडर म्हणून *मंदाकिनी भालके -गंभीरे* तर सदस्या *रेशमा गंभीरे,अलका गंभीरे,राधेश्वरी जाधव,हेमा गंभीरे,उषा गंभीरे,सुरेखा गंभीरे,संध्या गंभीरे,वैष्णवी गंभीरे,पुनम फावडे,जान्हवी जाधव,मनिषा बिडवे* ईत्यादीनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन - *मंदाकिनी भालके -गंभीरे मॕडम,माधुरी वलसे मॕडम* यांनी केले.
إرسال تعليق