लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी
औसा/प्रतिनिधी -लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती नवी दिल्ली येथील जुने महाराष्ट्र सदन येथे सह्याद्री उद्योग शिलता संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या जयंतीचे प्रमुख पाहुणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिरेमठ संस्थानचे,डॉ.शांतविर शिवाचार्य महाराजभाजपचे मा.सचिव सुनील देवधर होते.
लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोजन समितीचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.आणि संस्थेचे अध्यक्ष अरुण देहरकर ट्रस्टी कमलेश गायकवाड.सचिव रेवणकर .यांनी ही मान्यवरांचे स्वागत केले.तसेच यावेळी सूत्र संचालन एल के सूर्यवंशी यांनी केले .ॲड अग्रवाल.ऍड पंवार.प्रा.मधुकर सोनवणे ( निलंगा ).इरम जैदी.इलिया जाफर.प्रकाश कांबळे मान्यवर उपस्थित होते. लातूर चे खा.सुधाकर श्रुंगारे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला .खा.सुधाकर श्रुंगारे यांचे संस्थेने आभार व्यक्त केले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण देहरकर यांनी दिली.
إرسال تعليق