भाजपा रेणापूर तालुकाध्यक्षपदी अॅड. सरवदे तर लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे यांची निवड
लातूर – भारतीय जनता पार्टीच्या रेणापूर तालुकाध्यक्ष पदी अॅड. दशरथ सरवदे यांची तर लातूर तालुकाध्यक्ष पदी बन्सी भिसे यांच्या निवडीची घोषणा भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी सोमवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात केली. सदरील निवड जाहीर होताच दोन्ही अध्यक्षांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर आणि लातूर भाजपाच्या तालुकाध्यक्ष निवड अनुषंगाने दोन्ही तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्
रेणापूर तालुका भाजपाच्या बैठकीत रेणापूर तालुका भाजपा अध्यक्ष पदी निवड करण्याचा सर्व अधिकार आ. रमेशअप्पा कराड यांना सर्वानूमते देण्यात येत असून जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल असा ठराव चंद्रकांत कातळे यांनी मांडला असता त्यास वसंत करमुडे यांनी अनुमोदन दिले. तर लातूर तालुका बैठकीत अशाच प्रकारचा ठराव गोविंद नरहरे यांनी मांडला त्यास भागवत सोट यांनी अनुमोदन दिले. भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी दोन्ही बैठकीत उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून भाजपाच्या रेणापूर तालुकाध्यक्ष पदी अॅड. दशरथ सरवदे तर लातूर तालुकाध्यक्ष पदी बन्सी भिसे यांची निवड घोषित केली असता उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून फेर निवडीचे स्वागत केले. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचा दोन्ही तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दोन्ही तालुक्यातील बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, येणारा काळ निवडणूकीचा असून अध्यक्ष पदाला न्याय देण्याची अनेक कार्यकर्त्यांत क्षमता आहे. मात्र पद एकालाच देता येते ही अडचण लक्षात घेवून तालुका अध्यक्षाला सर्वांनी साथ देवून भाजपाचे संघटन मजबूत करावे, आपसातील मतभेद हेवेदेवे बाजूला सारावेत. विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपाला निष्कलंक नेतृत्व लाभले. त्यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती गावागावात वाडीवस्तीत कार्यकर्त्यांनी पोहचविली पाहिजे. लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघात विविध योजनेच्या माध्यमातून लाखो नव्हे तर कोट्यावधींचा निधी मंजूर केला. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे प्रगती पथावर असल्याचे सांगून पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी लातूर लोकसभेतील भाजपाचा खासदार बहमतांनी विजयी होण्यासाठी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे जनतेला न्याय देण्याच्या भुमिकेतून काम करावे असे आवाहन केले.
कार्यकर्त्यांना जपणारे, शक्ती-ताकद देणारे, कार्यकर्त्यांच्या सुख दु:खात सातत्याने सहभागी होणारे आ. रमेशअप्पा कराड यांचे नेतृत्त्व लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी जपले पाहिजे असे सांगून यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले की, रमेशअप्पांनी मला भाजपाचे जिल्हाध्यक्ष केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. येणारा काळ कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या निवडणुकीचा असून आपण सर्वजण मिळून लातूर जिल्हाभरात भाजपाचे भक्कमपणे संघटन मजबूत करुन प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा विजयी झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.
रेणापूर आणि लातूर या दोन्ही तालुक्याच्या वेगवेगळ्या झालेल्या बैठकीस साहेबराव मुळे, डॉ. बाबासाहेब घुले, शरद दरेकर, महेंद्र गोडभरले, सुंदर घुले, श्रीकृष्ण जाधव, सुकेश भंडारे, विजय गंभिरे, विजय चव्हाण, शिवाजी उफाडे, संजय डोंगरे, सुरज शिंदे, शामसुंदर वाघमारे, अरुण लांडगे, रशिद पठाण, योगिराज साखरे, भैरवनाथ पिसाळ, विनायक मगर, सुधाकर गवळी, विश्वास कावळे, प्रताप पाटील, गोपाळ पाटील, राम बंडापल्ले, अॅड. धनराज शिंदे, बालाजी दुटाळ, माधव घुले, सुरेश बुड्डे, पांडुरंग बालवाड, संतोष चव्हाण, गंगासिंह कदम, भागवत गित्ते, गोपाळ शेंडगे, उत्तम चव्हाण, महेश कणसे, अनंत कणसे, नानासाहेब कसपटे, सुनिल चेवले, दत्ता सरवदे, धनंजय पवार, उज्वल कांबळे, ललिता कांबळे, शिला आचार्य, अनुसया फड, सनिता माडजे, जनाबाई साखरे, मारुती गालफाडे, श्रीमंत नागरगोजे, रमा फुलारी, शिवराज पवार, नवनाथ माने, किशन क्षिरसागर, निजाम शेख, प्रशांत डोंगरे, अमोल वाघमारे, लखन आवळे, लक्ष्मण खलंग्रे, दिपक पवार, बाबासाहेब भिसे, समाधान कदम, आदिनाथ मुळे, अशोक सावंत, उमेश बेद्रे, बापूराव बिडवे, बालासाहेब कदम, धर्मराज शिंदे, वैजनाथ हराळे, मारुती शिंदे, उमेश बेद्रे, बापूराव चामले, शंकर चव्हाण, रुपेश काळे, संजय ठाकूर, दिनकर राठोड, रमेश चव्हाण, नरसिंग येलगटे, नाथराव गित्ते, शिवमुर्ती उरगुंडे, लक्ष्मण नागीमे, किरण रोंगे, ईश्वर बुलबुले, किशोर पवार, अरविंद पारवे, ज्ञानेश्वर जुगल, शुभम खोसे, पांडुरंग गडदे यांच्यासह लातूर आणि रेणापूर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق