खास शालेय विद्यार्थ्यांसाठी एमएस-सीआयटी फॉर स्कूल स्टुडंट्स कोर्स

खास शालेय विद्यार्थ्यांसाठी एमएस-सीआयटी फॉर स्कूल स्टुडंट्स कोर्स 
मागील २२ वर्षांपासून महाराष्ट्रात कम्प्युटर शिक्षणासाठी अग्रगण्य असलेल्या एमकेसीएल म्हणजेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने आपल्या अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत दरवर्षी नवनवीन बदल घडवत आपला एमएस-सीआयटी कोर्स अधिकाधिक अद्ययावत केला आहे. पहिल्यांदाच कम्प्युटर शिकत असलेला विद्यार्थीवर्ग आणि कम्प्युटर हाताळता येणारा परंतु नोकरी किंवा व्यवसायासाठी लागणारी स्किल्स शिकू इच्छिणाऱ्या वर्गासाठी एमकेसीएलने एमएस-सीआयटी कोर्स दोन विविध पद्धतीने उपलब्ध केला आहे. एमएस-सीआयटी – आयटी अवेअरनेस आणि एमएस-सीआयटी – जॉब रेडीनेस अशा दोन स्वरूपात मागील काही वर्षांपासून हा कोर्स केंद्रांमध्ये शिकण्यासाठी उपलब्ध आहे. कोर्स कंटेंट एकच असला तरी त्यातील उदाहरणे आणि असाईनमेंट्स वेगवेगळी आहेत. दोनही पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र एकसारखी असते. थोडक्यात, एमएस-सीआयटी कोर्स हा खऱ्या अर्थाने विद्यार्थीकेंद्रित कोर्स आहे. 

मागील ३ – ४ वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन पद्धती आणि कौशल्यांमध्ये झालेले बदल तसेच मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटचा शिक्षणासाठी होत असलेला वाढता वापर पाहता शालेय विद्यार्थ्यांना एमएस-सीआयटी कोर्समध्ये सध्या असलेल्या उदाहरणांसोबत आणि असाईनमेंट्ससोबतच अजून काही कौशल्ये शिकवण्याची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन एमकेसीएलने ऑगस्ट महिन्यापासून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी वाढीव कौशल्यांसह एमएस-सीआयटी कोर्स आपल्या सर्व अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. या कोर्समध्ये शालेय प्रकल्पांसाठी संपादित व्हिडिओ तयार करणे, अभ्यासासाठी डिजिटल स्किल्स अधिक प्रभावीपणे वापरणे, विविध शालेय स्पर्धांसाठी ऑनलाईन अॅप्लिकेशन करणे, शाळेच्या मेळाव्यासाठी फोटो अल्बम तयार करणे, शालेय उपक्रमांसाठी फ्लायर्स डिझाईन करणे, स्वत:च्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तयार करणे, ऑनलाईन लर्निंग मटेरियल शोधणे अशा अनेक असाईनमेंट्स आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या विविध कोडिंग स्किल्सची ओळख देखील या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. स्क्रॅच प्रोग्रामिंग, सी प्रोग्रामिंग, सी ++ प्रोग्रामिंग, पायथॉन प्रोग्रामिंग आणि मोबाईल अॅप् डेव्हलपमेंटची बेसिक्स या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना माहीत होतात. शाळा आणि क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचा जाणारा वेळ लक्षात घेऊन एमएस-सीआयटी फॉर स्कूल स्टुडंट्स या कोर्सला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स पूर्ण करण्याचा कालावधी २ महिन्यांवरून ३ ते ६ महिने असा केला आहे. शाळेला सुट्टी असलेल्या दिवशी, शनिवार – रविवारी, सणांच्या दिवशी विद्यार्थी हा कोर्स शिकून पूर्ण करू शकतात. यामुळे नियोजन नसलेल्या वेळेचे काय करायचे ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एमएस-सीआयटी फॉर स्कूल स्टुडंट्स. 
शाळा सुरू असतानाच मिळणाऱ्या वेळेत आणि प्रत्येक सुट्टीच्या दिवशी मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी त्यांना आवश्यक असलेल्या आय टी स्किल्स आणि स्टडी स्किल्स मिळवण्यासाठी घालवावा. 

शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी नजीकच्या एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रात जाऊन एमएस-सीआयटी फॉर स्कूल स्टुडंट्स विषयी अधिक माहिती घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मराठवाडा पूर्व विभागाचे समन्वयक श्री. महेश पत्रिके यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم