माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 12% लाभांश

माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 12% लाभांश
लातूर ः लातूर येथील माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेची 14 वी वार्षीक सर्वसाधारण सभा माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या., लातूर प्रिन्स स्टिल समोर कव्हा रोड, लातूर येथील कार्यालयात रविवारी खेळीमेळीत पडली या वेळी संस्थेचे चेअरमन राजकुमार पल्लोड यांनी सभासदांना 12 % लाभांश जाहीर केला.
या प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन नंदकिशोर सोनी, सचिव प्रेमकिशोर मुंदडा, संचालक सुरेश मालु, पुरुषोत्तम भंडारी, अ‍ॅड. संतोष गिल्डा, सौ. विजयश्री मुंदडा, सौ. मिनादेवी बांगड, संतोष पेठे, शिवाजी गवळी आदिची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मीपुजन व दिपप्रज्वलनाने सभेला सुरुवात करण्यात आली या वेळी अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना दोन मिनीट स्तब्धता पाळुन श्रध्दांजली वाहण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त संस्थेचे व्यवस्थापक बी. एन. पाटील यांनी केले अहवालातील विषय संचालकांनी मांडले त्यास सभासदांनी टाळयाच्या गजरात मान्यता दिली. संस्थेला सातत्याने ऑडीट वर्ग अ आहे. अहवाल सादर करताना संस्थेचे चेअरमन राजकुमार पल्लोड यांनी सांगीतले या प्रसंगी संस्थेचे कर्ज नियमित परतफेडणा-या कर्जदारांचा व ठेवीदाराचा तसेच उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पिग्मी एजंट व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव प्रेमकिशोर मुंदडा यांनी सभेचे सुत्रसंचालन केले तर आभार अ‍ॅड संतोष गिल्डा यांनी मानले. सभेस सभासद मोठया संखेने उपस्थित होते. वार्षीक सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक बी. एन. पाटील, गोविंद पवार, सोमनाथ पंडित, प्रकाश सरवदे, आनंद चांडक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم