आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेजच्या पालक शिक्षकांचा मेळावा संपन्न

आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेजच्या पालक शिक्षकांचा मेळावा संपन्न
देवणी/प्रतिनिधी- आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेज देवणी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् जयंती आणि पालक शिक्षक मेळावा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवर आणि पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था सचिव गजानन भोपणीकर यांनी निभावले. तर प्रमुख पाहुणे म्हणून कै. रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जावळे आणि उपप्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के व पालक प्रतिनिधी म्हणुन कांताबाई सुरवसे, जाधव, महादेव म्हेत्रे इत्यादि पालकांनी प्रमूख उपस्थिती दर्शविली. यावेळी मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ प्रशांत भंडे, केंद्र सहाय्यक डॉ गोपाळ सोमाने आणि समन्वयक प्रा. अमेर पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यानंतर क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक विक्रम गायकवाड यांचे मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य राहुल बालुरे यांनी केले.विद्यार्थ्यांनी अभ्यास क्रमातील विविध प्रकारच्या कार्यकृती घेवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती आपले मनोगत व्यक्त केले.या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कार्यकृतीचे पालकांनी व मान्यवरांनी खूप कौतुक केले.यानंतर अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव गजानन भोपणीकर यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिले व विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. 
    या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा मोठे, लीड को ऑर्डीनेटर क्षेमानंद कन्नाडे , वस्तीगृह अधीक्षक मंजुनाथ कन्नाडेआणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियोजनात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास नागराळे आणि आभार रणजीत गायकवाड यांनी मानले.यावेळी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم