भाजपाच्या औसा ग्रामीण व कासारसिरसी मंडळ अध्यक्षांची निवड तर शहराध्यक्षपदी सुनील उटगे

भाजपाच्या औसा ग्रामीण व कासारसिरसी मंडळ अध्यक्षांची निवड तर शहराध्यक्षपदी सुनील उटगे
औसा - औसा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या औसा ग्रामीण अध्यक्षपदी सुभाष जाधव व कासारसिरसी मंडळ अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाकडे यांची फेरनिवड तर औसा शहर भाजपच्या अध्यक्षपदी सुनील उटगे यांची निवड करण्यात आली आहे.(दि.१०) सप्टेंबर रोजी औसा येथील औसा विधानसभा मतदारसंघ संघटनात्मक बैठक आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभात या निवडीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली असून याप्रसंगी भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचा गौरव व मावळते जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांचा सत्कार औसा भाजपाच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांनी केला. 

                  यावेळी मंचावर नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, लातूर लोकसभेचे प्रभारी राहुल केंद्रे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, भाजपचे नूतन औसा शहरध्यक्ष सुनील उटगे, महेश पाटील, लहू कांबळे,धनराज परसणे, कल्पना डांंगे, कल्पना ढविले,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन आनसरवाडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार बोलत होते की भाजप पक्ष हा एक परिवार आहे. पद हि भूषणीय नाही तर एक जबाबदारी आहे.पक्ष हा कोणी एकाचा नसतो पक्ष पक्ष असतो नेता नेता असतो लातूर जिल्ह्य़ात त्या त्या ठिकाणी पक्ष बांधणीचे काम सुरू असून नूतन जिल्हाध्यक्षांनी सर्वाना समान न्याय द्यावा पक्षाच्या कार्यपद्धतीने पक्ष चालावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त करीत रमेश कराड यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून धडाडीचे काम केले विशेषता कोव्हीडच्या काळात त्यांचे काम उल्लेखनीय राहिल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी औसा तालुक्यातील अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचा सत्कार पक्षाच्या वतीने उपस्थित मान्यवरांने केला या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले. 

शेतरस्त्यांचा पॅटर्न तयार करणारे महाराष्ट्रातील अभिमन्यू पवार एकमेव आमदार - दिलीपराव देशमुख 


आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या दुष्टीने महत्त्वाच्या शेत तिथे रस्ता या अभियानातून तेराशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे पूर्ण केले हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी तेराशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते तयार केले आहेत. त्यांच्या या कामामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्ष बांधणीसाठी आपली साथ महत्वपूर्ण असून येणाऱ्या काळात जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका आपण ताब्यात घेऊ असे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले. 

औसा मतदारसंघ आज राज्यात अव्वल - रमेश कराड 
यावेळी बोलताना आ. रमेश कराड म्हणाले की ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे काहिच काम नसताना आमदार अभिमन्यू पवार यांनी स्व:च्या कर्तुत्वावर व नियोजनातून ताब्यात घेतला तो औसा मतदारसंघ आज राज्यात अव्वल असून गेल्या पन्नास वर्षांत जे काम झाले नाही ते काम आज आ. अभिमन्यू पवार यांच्या रुपाने होत असून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

Post a Comment

أحدث أقدم