प्रा. सुरवसे यांना क्रांतिवीर लोक प्रबोधनकार पुरस्कार देऊन गौरव

प्रा. सुरवसे यांना क्रांतिवीर लोक प्रबोधनकार पुरस्कार देऊन गौरव

औसा/प्रतिनिधी-हैद्राबाद मुक्ती संग्रामात क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान  या विषयावर दि. 16/08/2023 पासून लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील 111  शाळा व महाविद्यालयात  व्याख्याने झाले आहेत. यात 15 व्याख्याते  व्याख्यान देत आहेत,त्यांनी करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन दि. 10/09/2023 रोजी क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवताळा ता. औसा येथे भरत सूर्यवंशी (तहसीलदार, औसा) यांच्या हस्ते व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे चिरंजीव विवेक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. दत्तात्रय सुरवसे यांना  क्रांतिवीर लोक प्रबोधनकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी श्री बसवराज मंगरूळे (औरंगाबाद) ,मातोळा येथील सरपंच सौ. आशाताई भोसले, सहायक विकास अधिकारी कमलाकर सावंत व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलाकर सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य  डॉ.दौलतराव घोलकर यांनी केले याप्रसंगी  परिसरातील नागरिक, 15 व्याख्याते  व अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم