लिंगायत महासंघाची नुतन लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी करीबसवेश्‍वर पाटील तर जिल्हा संघटकपदी काशीनाथ मोरखंडे

 लिंगायत महासंघाची नुतन लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी करीबसवेश्‍वर पाटील तर जिल्हा संघटकपदी काशीनाथ मोरखंडे


लातूर ः लिंगायत महासंघाची 2023-2024 सालासाठी लातूर जिल्हा कार्यकारिणी आज दि.16 सप्टेंबर 2023 रोजी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी जाहीर केली. यात लातूर जिल्हाध्यक्षपदी करीबसवेश्‍वर पाटील तर जिल्हा संघटकपदी पुर्वीचेच काशीनाथ मोरखंडे यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत तोळमारे यांची निवड करण्यात आल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
लिंगायत महासंघाच्या नुतन जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी पाटील, शिवाजी भातमोडे, बस्वराज ब्याळे, गणेश पटणे, शिवानंद भुसारे, उमाकांत नागलगावे, तानाजी डोके, दिलीप सोलगे आदिंची यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कोषाध्यक्षपदी शिवदास लोहारे, सहकोषाध्यक्ष सुर्यकांत मळगे, जिल्हा सहसचिव संतोष शेळके, सोमनाथ स्वामी, गुंडप्पा राघो, उमाकांत किडीले यांची तर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून गणेश बिराजदार, बब्रुवान रकसाळे, माणिक कोकणे, निलेश करंजे, शरण पाटील, युवराज बुलबुले, महादेव बेंजरगे, रमेश वेरूळे, योगेश स्वामी, सुरज मुळे यांची तर लातूर जिल्हा युवक अध्यक्ष विजय खिंडे व महिला प्रतिनिधी प्रा.डॉ.मधुबाला हुडगे यांचीही जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. तसेच याप्रसंगी जिल्हा सल्लागार मंडळावर विश्‍वनाथप्पा मिटकरी, नागनाथप्पा भुरके, सिद्रामप्पा पोपडे, जी.जी.ब्रम्हवाले, माणिक मरळे, डॉ.शंकरराव पडसाळगी, गोरोबा काका शिवणे, हल्लप्पा कोकणे, सुरेश त्रीमुखे, कमलाकर डोके यांची निवड करण्यात आली. तर महात्मा बसवेश्‍वर तत्व प्रचारक म्हणून डॉ.मन्मथ गताटे व अप्पासाहेब बिराजदार यांची निवड करण्यात आली. तसेच निलंगा शहराध्यक्षपदी युवकास प्राधान्य देवून सचिन रंडाळे यांना शहराध्यक्ष करण्यात आले. जळकोट तालुकाध्यक्षपदी पत्रकार शिवाजी काळे, तालुका संघटकपदी संपत हत्ते यांची तर रेणापूर तालुकाध्यक्षपदी राजेश्‍वर उकीरडे यांची निवड करण्यात आली. या सर्व निवडीबद्दल लिंगायत महासंघाच्यावतीने वरील पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले व या सर्व पदाधिकार्‍यांचा रविवार दि.24 सप्टेंबर 2023 रोजी उदगीर येथे होणार्‍या वधू-वर परिचय मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم