डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते एसव्हीएसएस संकुलात विघ्नहर्ता गणेशाची पूजा संपन्न

डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते एसव्हीएसएस संकुलात विघ्नहर्ता गणेशाची पूजा संपन्न
      औसा/प्रतिनिधी- श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ,लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयामध्ये गणेश चतुर्थी निमित्त आरतीचे प्रमुख अतिथी लाईफ केअर हॉस्पिटल उदगीरचे अध्यक्ष डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषणे जय जयकार करून गणेशाची आरती करण्यात आली. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच महाविद्यालयाचा सर्व परिसर व लॅब पाहून खूप छान वाटत असे प्रमुख पाहुणे प्रतिपादन केले. आणि महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सुख ,समृद्धी व ज्ञानवर्धिगत होवो ही गणेश चरणी प्रार्थना केली. तसेच पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचबरोबर सोबत संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे, उपाध्यक्ष जयदेवी बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,सचिव वेताळेश्वर बावगे,संचालक माधुरी बावगे ,नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ श्यामलीला जेवळे ,प्राचार्य डॉ. विरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला , शुभम वैरागकर,ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم