विलास को.ऑपरेटीव्ह बॅक ली. कडून गणपती विर्सजन मिरवणूकीसाठी असलेल्या पोलीसांना अल्पआहार व्यवस्था

 विलास को.ऑपरेटीव्ह बॅक ली. कडून गणपती विर्सजन मिरवणूकीसाठी असलेल्या पोलीसांना अल्पआहार व्यवस्था




लातूर (प्रतिनिधी) लातूर शहरासह जिल्हयात गणेश चतुर्थी पासून मोठया उत्साहात गणेशोत्सव
विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. गुरूवार दि. २८
सप्टेंबर २३ रोजी गणपतीची मिरवणूक काढून विर्सजन करण्यात येत आहे.
यावेळेत मिरवणूकीच्या नियोजनासाठी बदोबस्तावर असलेल्या १२०० पोलीसाच्या
अल्पआहाराची व्यवस्था विलास को.ऑपरेटीव्ह बॅक ली.च्या वतीने करण्यात आली
आहे.
कोणताही सार्वजनीक सणउत्सव साजरा करीत असतांना पोलीस व्यवस्थेवर मोठा ताण
असतो, या काळात त्याच्या संदर्भातील व्यवस्थेकडे मात्र कोणीही लक्ष देत
नाही. या अनुषंगाने लातूर शहरातील मिरवणूकाच्या वेळी बंदोबस्तावर
असलेल्या पोलीसाच्या अल्पआहाराची व्यवस्था विलास को.ऑपरेटीव्ह बॅक
ली.च्या वतीने करण्यात यावी अशी सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण
सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी केली.
गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमण झाले पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला मिरवणूक काढून निरोप दिला जातो. हा सर्व
गणेशोत्सव आनंद, उत्साहाने साजरा करीत असतांना पोलीस प्रशासन आणि
पोलासांवर शांतता, सुरक्षीतता आण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी
बंदोबस्तावर रहावे लागते. गणपती विर्सजन मिरवणूका सुरू झाल्यावर तर २४
तास सेवेत रहावे लागते या काळात त्यांची व्यवस्थाव व्हावी या करीता लातूर
शहरातील पोलीसाच्या अल्पआहाराची व्यवस्था विलास को.ऑपरेटीव्ह बॅक ली.च्या
माध्यमातून करण्यात आली आहे. या बॅकेकडून सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात
१२००  पोलीसाच्या अल्पआहाराची सुवीधा केली.
अल्पआहाराचे सर्व पॉकेट गांधी चौक पोलीस स्टेशन येथे वाहतूक निरीक्षक
गणेश कदम, पोलीस उपनिरीक्षक गावंडे, पोलीस कर्मचारी केंद्रे, बिराजदार
यांच्याकडे देण्यात आले. यावेळी विलास को.ऑपरेटीव्ह बॅक ली.चे चेअरमन ॲड.
किरण जाधव, व्हा. चेअरमन समद पटेल, संचालक व्यंकटेश पूरी, रमेश
सुर्यवंशी, महेश कोळे, विष्णूदास धायगूडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم