गुरुवंदना राष्ट्रभुषण जीवनगौरवाने मुख्याध्यापक चव्हाण सन्मानित

गुरुवंदना राष्ट्रभुषण जीवनगौरवाने मुख्याध्यापक चव्हाण सन्मानित 
लातूर/प्रतिनिधी -गोवा हिंदी अकादमी व विद्यार्थी विकास अकादमी,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन व राधाकृष्णन जन्मदिन निमित्त गुरुवंदना राष्ट्रभुषण जीवनगौरव सन्मान 2023 ,कोल्हापूर येथे शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील मुख्याध्यापक श्री सूर्यकांत चव्हाण यांना सन्मानित केले.
या वेळी  शंभू भाऊ बांदेकर उपसभापती गोवा विधानसभा, डॉ रजनीताई शिंदे अध्यक्ष वेध फाउंडेशन, श्री सुनील शेठ अध्यक्ष गोवा हिंदी अकादमी गोवा, डॉ बी एन खरात अध्यक्ष विद्यार्थी विकास अकादमी सिंधुदुर्ग ज्यांनी माझी शिफारस केली त्या प्रा सौ प्रतिभा चव्हाण मॅडम ,मित्र श्री अमोल पाटील कोल्हापूर ,सोबत पत्नी सौ. संगीता चव्हाण उपस्थित होते, पुरस्कार प्राप्ती बद्दल मा आ शिवाजीराव पाटील कव्हेकर, सौ प्रतिभाताई पाटील कव्हेकर ,मा अजितसिंह पाटील कव्हेकर ,मा निळकंठराव पवार साहेब ,प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा कांदे, श्री बापूसाहेब गोरे ,आदीनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم