रसिका शैक्षणिक संकुलामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

रसिका शैक्षणिक संकुलामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

 देवणी/प्रतिनिधी -रसिका शैक्षणिक संकुलामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सौ.लताबाई गोविंदराव बिरादार आईसाहेब,भामाबाई पंढरपुरे,संगीता निडवंचे यांची उपस्थिती होती.यावेळी आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राहुल बालूरे, कै. रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांच्यासह महाविद्यालयातील व आबासाहेब इंग्लिश मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم