लातूर येथील एम.आय.टी. येथे बी.फार्मसी अभ्‍यासक्रमास मान्‍यता; प्रवेश प्रक्रिया सुरू

 लातूर येथील एम.आय.टी. येथे बी.फार्मसी

 अभ्‍यासक्रमास मान्‍यताप्रवेश प्रक्रिया सुरू

लातूर - लातूर येथील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्‍या माईर्स पुणे या संस्‍थेच्‍या महाराष्‍ट्र इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्‍युटीकल सायन्‍सेसलातूर या महाविद्यालयात बी. फार्मसी अभ्‍यासक्रमास शासनाने चालू शैक्षणिक वर्षात मान्‍यता दिली आहे. सदरील अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्‍छुक विद्यार्थ्‍यांनी तात्‍काळ आपला प्रवेश निश्चित करून घ्‍यावा असे आवाहन लातूर एमआयटीचे सहाय्यक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे यांनी केले आहे.

लातूर येथील एमआयटी संस्‍थेअंतर्गत असलेल्‍या वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयास नव्‍याने बी. फार्मसी या अभ्‍यासक्रमाची मान्‍यता मिळाली असून फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियामहाराष्‍ट्र शासनाचे तंत्र शिक्षण विभाग आणि स्‍वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड या सर्वांच्‍या मान्‍यता प्राप्‍त झाल्‍या  आहेत. सर्व सोयीनींयुक्‍त असलेल्‍या सुसज्‍ज इमारतीत सदरील बी. फार्मसी महाविद्यालय सुरू होत असून तज्ञ प्राध्‍यापक व इतर शेक्षणिक सुविधा निर्माण करण्‍यात आल्‍या आहेत.

बी. फार्मसी या अभ्‍यासक्रमाची मान्‍यता लातूर एमआयटीला मिळाल्‍याने इच्‍छुक बी. फार्मसीच्‍या  विद्यार्थ्‍यांना सर्व सोयीनींयुक्‍त असे महाविद्यालय उपलब्‍ध झाले आहे. इतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या समुहात या विद्यार्थ्‍यांचा सुसंवाद घडून येणार असल्‍याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांची मोठी सोय झाली आहे.

लातूर एमआयटीच्‍या बी. फार्मसी या अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेसाठी शैक्षणिक वर्षे २०२३-२४ या प्रथम वर्षाकरीता केंद्रीभूत प्रवेश फेरी क्र. ३ मध्‍ये पात्र झालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी लातूर एमआयटीच्‍या विश्‍वनाथपूरम अंबाजोगाई रोडलातूर येथील महाविद्यालयीन कार्यालयात जावून आपला प्रवेश ९ सप्‍टेंबर २०२३ पर्यंत निश्चित करावा असे आवाहन लातूर एमआयटीचे सहाय्यक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळेबी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होगाडेमुख्‍य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم