“आयुष्मान भव:” मोहिमेचा शुभारंभ

 आयुष्मान भव:” मोहिमेचा शुभारंभ

आयुष्मान भव:” मोहिमेअंतर्गत हेल्थ कार्ड (आभा कार्ड) काढून घेणेबाबत...

 

 

 लातूर-दिनांक 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत “आयुष्मान भव:” ही मोहीम विवीध उपक्रमाद्वारे राबविणेबाबत शासनाच्या सूचना आहेत. काल दि.13.09.2023 रोजी मनपाच्या सर्व प्रा.ना.आ.केंद्र येथे अवयवादानाची प्रतिज्ञा घेवून व एकूण 283 नागरिकांचे हेल्थ कार्ड (आभा ID) तयार करून “आयुष्मान भव:” या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी 3.0 या उपक्रमाअंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत गृहभेटी देवून नागरिकांचे हेल्थ कार्ड (आभा ID) काढण्यात येणार आहे. तसेच मार्गदर्शक सूचनास अनुसरून दि.02.10.2023 पर्यंत दर शनिवारी मनपाच्या प्रत्येक प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्र / आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच गणेश मंडळांना रक्तदान शिबीर आयोजित करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाला हेल्थ कार्ड (आभा ID) देण्यात येत आहे. रुग्णाच्या नोंदणीपासून ते तपासणी, लॅब रिपोर्ट,उपचार, ब्लड ग्रुप इ. आरोग्यविषयक सर्व रेकॉर्ड या डिजिटल माध्यमातून संग्रहित करून ठेवता येणार आहे. त्यामुळे भविष्यात डॉक्टरांकडे जाताना जुने रेकॉर्ड ठेवण्याची गरज राहणार नाही किंवा दाखवण्याची गरज लागणार नाहीए. हेल्थ कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्ड आपल्या मोबाईल क्रमांकाला लिंक असणे आवश्यक आहे.

 तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपले व आपल्या पाल्याचे (5 वर्षावरीलहेल्थ कार्ड नजिकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र / आरोग्यवर्धिनी केंद्र येथे जावून किंवा स्वतः मोबाईल वरती ABHA ID वेबसाईटवर जावून तयार करून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم