मराठवाडा मुक्तिसंग्राम' या विषयावर विविध दृष्टिकोनातून नावीन्यपूर्ण संशोधन होणे आवश्यक.- डॉ. जयद्रथ जाधव

 मराठवाडा मुक्तिसंग्राम' या विषयावर विविध दृष्टिकोनातून नावीन्यपूर्ण संशोधन होणे आवश्यक.- डॉ. जयद्रथ जाधव



लातूर/प्रतिनिधी -जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन लातूर यांच्या वतीने आयोजित *शौर्यगाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची* याअंतर्गत सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उप -परिसर, लातूर येथे *डॉ. जयद्रथ जाधव* , सरांचे *"शौर्यगाथा मराठवाडा मुक्ति संग्रामाची"* या विषयावर  दि.१ सप्टेंबर २३ रोजी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. एस. एस. कोंडेकर सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात संकुलातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एच. कडेकर,  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. आर. पाटील यांनी केले. या वेळी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे ऐतिहासिक महत्व व बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन यांचा उद्देश अधोरेखित केला.
डॉ. जयद्रथ  जाधव यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच महत्व, ह्या लढ्याची नेमकी प्रसंगिकता आणि राजकीय नेतृत्वाने या विषयाला दिलेलं कमी महत्व यावर आपले भाष्य केले. नव्या पिढीने हा लढा नवनवीन व विविध  दृष्टिकोनातून समजून घ्यावा तसेच त्याला ज्ञानव्यहरासोबतच प्रत्यक्ष व्यवहारातून उद्याचा मराठवाडा उज्जवलं घडवावा..यासाठीच इतिहास समजून घ्याव्याचा असतो असे प्रतिपादन त्यांनी केले. 


अध्यक्षीय समारोपात डॉ. कोंडेकर सरांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि स्वातंत्र्यदिन, यामधील फरक अधोरेखित करत या विषयाचे महत्व जाणून घेण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित केले. 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल जायभाये, व आभार प्रदर्शन विजयकुमार उपाडे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यापीठ, उप-परिसरातील प्राध्यापक, डॉ. डी. आर. आदमाने, डॉ.बी.बी.आदमाने,  श्री. दत्ता करंडे, प्रा.पंचशील डावकर, प्रा.विद्या हातोळकर, प्रा. त्र्यंबक गवळे, प्रा.संजय स्वामी, प्रा. बसवराज स्वामी यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم