गणेशोत्सव शांततेत पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 गणेशोत्सव शांततेत पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे


लातूर : जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळानी पोलिसांनी आखून दिलेल्या नियमाच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी पोलीस प्रशासनाने 'आचारसंहिताही पुस्तिका काढली आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी या पुस्तिकेतील सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या गणेशोत्सव तयारीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित  बैठकीत ना. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उदगीर येथे गणेश मंडळाबरोबर गणेशोत्सव या संदर्भात आपण जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांच्यासह बैठक घेतली. जिल्ह्यात सगळीकडे पोलीस प्रशासनाकडून अशा बैठका झाल्या आहेत. लातूर जिल्हा हा नेहमीच आदर्श परंपरा आणि सौहार्द सांभाळणारा म्हणून ओळखला जातो. ही परंपरा कायम राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने 'आचारसंहिता ही पुस्तिका काढली आहे. सर्व गणेश मंडळानी यातील नियमाचे काटेकोरपणे पालन करावे आणि गणेशोत्सव शांतते पार पडेल, यासाठी जिल्हा प्रशासनपोलीस यांना सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री श्री. बनसोडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم