देवणीत सार्वजनिक दहीहंडी महोत्सव साजरा

देवणीत सार्वजनिक दहीहंडी महोत्सव साजरा

देवणी देवणी येथे : सार्वजनिक दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सोहळ्याचे उद्घाटन गोविंदराव भोपणीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार पत्रिके होते. प्रमुख पाहुणे युवा उद्योजक शिषेराव मानकरी, गजानन भोपणीकर, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, नगरसेवक अमित सूर्यवंशी, महादेव मळभगे, माजी सरपंच बाबुराव लांडगे, देविदास पतंगे, मंडळ अधिकारी ढगे, उपप्राचार्य शिवाजी सोनटक्के आदी उपस्थित होते.

कार्यक्रमांमध्ये बंजारा व शंभू नारायण या दोन संघाने सहभाग नोंदविला होता. यामध्ये संघात बंजारा संघाने बाजी मारली. यावेळी अंकुश माने, गोविंदराव बुरले, शिवानंद मळभगे, अमरदीप बोरे, अजय शिंदे, चंद्रकांत मोटेरावे, सादक कुरेशी, सरोजा मोटेरावे, पप्पू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य संयोजक रितेश सूर्यवंशी, दहीहंडी समिती अध्यक्ष प्रशांत कांबळे, उपाध्यक्ष अजीम तांबोळी, सचिव गणेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष शादुल शेख, सहसचिव प्रवीण शिंदे दहीहंडीच्या यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم