मनपाकडून गणेशोत्सवाची तयारी पर्यावरण पूरक मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन

 मनपाकडून गणेशोत्सवाची तयारी पर्यावरण पूरक मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन

यंदाही उभारणार मुर्ती संकलन केंद्र

    लातूर/प्रतिनिधी: गणरायाचे आगमन अवघ्या कांही दिवसांवर आलेले असताना लातूर शहर महानगर पालिकेकडून गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे.विविध मंडळे आणि नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापित करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणेच घरगुती गणेश मंडळांसाठी मूर्ती संकलन केंद्र व मंडळांच्या मोठ्या मूर्तींसाठी गणेश मूर्ती विसर्जन केंद्रची व्यवस्था मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे.

   गणेशोत्सव अवघ्या कांही दिवसांवर आला आहे.मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची स्थापना होणार आहे.या अनुषंगाने पालिका कामाला लागली आहे. गेल्या कांही वर्षांपासून प्रदूषण टाळण्यासाठी मनपा गणेश मूर्ती संकलन केंद्र कार्यान्वित करते. यामुळे गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला कांही अंशी प्रतिबंध करता येऊ शकतो.

     यावर्षी श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीच मनपाने या सर्व बाबींचे नियोजन केले आहे.नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची स्थापना करावी. संकलन केंद्रात देता येतील अशा आकाराच्या मूर्ती स्थापित कराव्यात,असे आवाहन पालिकेने केले आहे.सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींसाठी १२ नंबर पाटी जवळील खदानीत या मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. यासाठी संबंधित मंडळांनी स्वतःच्या वाहनाने मूर्ती तेथपर्यंत आणाव्याततसेच श्री गणेश मुर्तीचे विसर्जन मिरवणुक श्री सिध्देश्वर मंदीर परीसरकव्वा रोडबांधकाम भवन  या  ठिकाणी  मिरवणुकी नंतर श्री गणेश मुर्तीचे संकलन करण्यात येणार आहे.

   यावर्षी शहरात एकूण १५ ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे.नांदेड रस्त्यावर यशवंत शाळा,विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी,मंठाळे नगरमध्ये मनपा शाळा क्रमांक ९सिध्देश्वर मंदिरजिल्हाधिकारी कार्यालया जवळील शासकीय विहीरबार्शी रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाण्याची टाकी,दयानंद महाविद्यालयाचा पार्किंग परिसर,सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी,टाऊन हॉलबांधकाम भवन,कव्हा रस्त्यावर खंदाडे नगरसाळे गल्लीतील यशवंत शाळा,तिवारी यांची विहीर,गणेश मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिर ग्रीन बेल्ट या ठिकाणी यावर्षी मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.

    शहरातील नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची स्थापना करावी. विसर्जना वेळी आपल्याकडील गणेश मूर्ती मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रात द्याव्यात. पालिकेकडून या सर्व मूर्तींचे १२ नंबर पाटीवरील खदानीत विधीवत विसर्जन केले जाणार आहे.नागरिक व गणेश भक्तांनी या उपक्रमात मनपाला सहकार्य करावेअसे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

أحدث أقدم