एक मराठा लाख मराठा जय घोषात शिरुर ताजबंद बाजार कडकडीत बंद

एक मराठा लाख मराठा जय घोषात शिरुर ताजबंद बाजार कडकडीत बंद
शांततेच्या मार्गाने उपोषण करत असताना लाठीचार्ज केल्याचा निषेध
शिरुर ताजबंद : ३ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करत असताना अंतरवाली सराटी ता. अंबड उपोषणकर्त्यांवर पोलीसांनी अमानुषपणे लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्त एक मराठा लाख मराठा घोषणा देत मुख्यबाजार पेठेत राज्यशासनाचा निषेध केला.
मराठा समाजाच्या आरक्षण व अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे- पाटील हे अंतरवाली सराटी ता. अबंड येथे दि. २९ ऑगस्ट पासून शांततेत बेमुदत उपोषण करत असताना उपोषणाच्या चवथ्या दिवशी पोलीसांनी उपोषण स्थळी जावून अमानुष पणे लाठीचार्ज केला ही कृती पुर्णपणे चुकीचे असून याचा सकल मराठा समाजाच्या वतीने
राज्यशासनाचा निषेध करण्यात आला. शिरुर ताजबंद येथील सर्व समाजाच्या व्यापारी व तरुणांनी बंदला जाहीर पाठिंबा देत व्यापार पेठ बंद ठेवून बंदला पाठींबा देण्यात आला. सकल मराठा समाजाचे शिवानंद भोसले, सिद्धेश्वर औरादे, किशन कापशे, बालाजी जवळगे, सत्यवान भोसले, जयवंत सगर, शिवाजी कापसे, हर्षवर्धन डोंगरे, बालाजी गूंडरे, लक्ष्मीकांत वाघमारे, गजानन वलसे, संतोष महापुरे, संजय वाघमारे, हनुमंत बडगिरे, दत्तात्रय जवळगे, इस्माईल किनीवाले, अमोल भोसले, गजानन तेलगाने, संजय बुरुसपट्टे, अंगद वाघमारे, माधव भगत, रामकिशन पडोळे, नामदेव श्रीमंगले, कमलाकर वाघमारे, यशवंत कांबळे, खेडकर माधव, राजू सोलपुरे, बबन मोरे, भालेराव परमेश्वर, वाशीम शेख, आनंद गुंडरे, दत्ता महापुरे, ज्ञानोबा मंतलवाड, विनोद ढेपे, गणेश भोसले, महापुरे सोमनाथ, परमेश्वर वाढवणकर, ज्ञानेश्वर पाटील, सचिन गवळी, विक्रम भोसले सह सर्व समाजातील समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم