जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खोरी गल्ली येथे विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खोरी गल्ली येथे विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन
 लातूर/प्रतिनिधी:शहरातील खोरी गल्ली परिसरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले.खोरी गल्लीतील वेद प्रतिष्ठानच्या सार्वजनिक वाचनालयाच्या जवळ हे विरंगुळा केंद्र उभारण्यात येत आहे.यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.विरंगुळा केंद्राच्या भूमिपूजन समारंभास मनपा उपायुक्त श्रीमती मयुरा शिंदेकर,सहाय्यक आयुक्त सौ.मंजुषा गुरमे व महिला बाल विकास अधिकारी रुक्मानंद वडगावे यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.बी. जोशी,उपाध्यक्ष काशिनाथ सलगर,सचिव प्रकाश घादगिने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.


   यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर यांनी शहरात विरंगुळा केंद्र उभारून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनपाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.वृद्धांना मन रमविण्यासाठी अशी केंद्र उपयुक्त ठरतात.या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होऊ शकते.वृद्धांचे जीवन सुसह्य करणारा हा उपक्रम आहे.पालिकेने अशी आणखी केंद्र सुरू करावीत,अशा सूचनाही त्यांनी केल्या.

           प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ. सौ.माया कुलकर्णी,आर.के.पाटील,शहाजी घाडगे,भगवानराव देशमुख,कालिदासराव देशपांडे,भारत सातपुते यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ व वेद प्रतिष्ठानच्या सभासदांसह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم