लातूर काॅलेज आॅफ फार्मसीत शिक्षक दिन उत्साहात साजरा

लातूर काॅलेज आॅफ फार्मसीत  शिक्षक दिन उत्साहात साजरा
औसा-हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव येथे शिक्षक दिन उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यां तर्फे आयोजीत करण्यात आला होता.

    सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व प्राध्यापकांचा सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. यावेळी मंचावर वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे , प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे-जेवळे , मुख्याध्यापक कालिदास गोरे उपस्थित होते.

     यावेळी खरा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जायला शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचा वाटा उचलतो, त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष न करता शिक्षकांच्या या सर्व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आहे असे प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे-जेवळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कालिदास गोरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून गुरु शिष्य प्रबोधन पर कथा सांगितली. वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक नंदकिशोर बावगे सरांनी अपूर्ण ला पूर्ण करणारे , शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडविणारे, तत्त्वज्ञानातून मूल्य फुलविणारे शिक्षक असतात असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षकाची व्याख्या त्यांनी सुलभ शब्दात व्यक्त केली.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती शिरूरे तर आभार झरे संकेत यांनी मानले. यावेळी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक हासेगाव, ज्ञानसागर विद्यालय हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय हासेगाव येथील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم