हासेगावच्या फार्मसी महाविद्यालयांमध्ये दहीहंडी आणि राधा कृष्ण स्पर्धा संपन्न

हासेगावच्या फार्मसी महाविद्यालयांमध्ये 
दहीहंडी आणि राधा कृष्ण स्पर्धा संपन्न
औसा/ प्रतिनिधी- श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दहीहंडी आणि राधा कृष्ण जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद तिरमले (गोविंद नगर मंदिराचे महाराज ) आणि सौ श्यामल गोविंद तिरमले संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, डॉ. श्यामलीला जेवळे (बावगे) प्राचार्य डॉ वीरेंद्र मेश्राम , प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला आणि मुख्याद्यापक कालिदास गोरे उपस्थित होते. 
     श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित चालणाऱ्या सर्व महाविद्यालय दहीहंडी कार्यक्रमात एकूण 13 टीम चा सहभाग होता . दहीहंडी नियमांचे पालन करून दहीहंडी फोडण्यासाठी मुलांच्या ग्रुप्स मधून लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव महाविद्यालया च्या अंतिम वर्षाच्या अप्पा गोविंदा ग्रुप्सने प्रथम पारितोषिक दोन हजार रोक रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. . तर मुलींच्या ग्रुप्स मधून लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर महाविद्यालया च्या मुलींच्या गोविंदा ग्रुप्स एक हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच राधा कृष्ण जोडीची स्पर्धा आयोजन करण्यात अले असता भावना महामुनी आणि भक्ती परळे या विध्यार्थीने राधा कृष्ण जोडीत बाजी मारली आहे . तर द्वितीय राधा कृष्ण जोडी संदीप माने आणि जाधव कांचन याही जोडीना रोक रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले . 
  याप्रांसगी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर , महाविद्यालातील रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश बनसोडे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.            
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.बालाजी खवले यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم