नगरपालिकेसमोर ठाकरे गटाकडून बोंब मारो आंदोलन

नगरपालिकेसमोर ठाकरे गटाकडून बोंब मारो आंदोलन

मुरुम (प्रतिनिधी) : येथील नगरपालिका प्रशासनाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय सभेत पालिकेत मिळणाऱ्या विविध प्रमाणपात्रासाठी अकारण्यात येणाऱ्या दरामध्ये दुप्पट-तिप्पट वाढ केल्याने शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी (ता. ८) रोजी नगरपालिकेसमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले आहे. नगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे मनमानी कारभार पाहत आहेत. दरम्यान शहरासह संपूर्ण राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके पूर्णतः हातचे गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. यात अधिकची भर पडावी की काय म्हणून नगरपालिकेतील तुघलकी प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पिय सभेत नगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या नामांतर फीस, व्यवसाय प्रमाणपत्र, रिव्हिजन नक्कल, नाहरकत प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंद दाखला यासारख्या विविध प्रमाणपत्राच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे युवासेना तालुका प्रमुख अजित चौधरी यांच्या नेतृत्वात मुरूम नगरपालिकेवर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर प्रमुख जगदीश निंबरगे, राजू मुदकण्णा, विशाल मोहिते, संजय आळंगे, बालाजी बेंडकाळे, दादा बेंडकाळे, दत्ता हुळमुजगे, दादा टेकाळे, आरिफ कुरेशी, धनंजय अंबर, जयसिंह खंडागळे, प्रवीण चौधरी यांच्यासह शिवसेना युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم