शिव छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर संपन्न

शिव छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर संपन्न 
अनसरवाडा /प्रतिनिधी - निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे शिव छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ अनसरवाडा व अभिजित (नाना) उसनाळे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. 
या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष अभिजित(नाना)उसनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 30 रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून सहकार्य केले. मोठ्या प्रमाणावर उपस्थित मान्यवरांनी भेटी दिल्या.यामध्ये दत्ता शाहीर  यांनी शिबिराला भेट दिली. मंडळाचे कार्यकर्ते उसनाळे लहू ,शिवाजी माने,वैभव पाटील,सुदर्शन उसनाळे,तुकाराम उसनाळे,ऋषी गिरी, अनिल उसनाळे,दिनेश शिंदे यांनी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم