सुवर्णमोहत्‍सवी सामुदायीक दसरा महोत्सव समिती स्वागताध्यक्षपदी आ. रमेशअप्पा कराड यांची निवड

सुवर्णमोहत्‍सवी सामुदायीक दसरा महोत्सव समिती 
स्वागताध्यक्षपदी आ. रमेशअप्पा कराड यांची निवड
          लातूर - दसरा धार्मीक सणा बरोबरच राष्ट्रीय सण असून क्षात्रतेजाचे दर्शन घडविणारा लातूर शहरात गेल्या पन्नास वर्षापासून सामुदायीक दसरा साजरा करण्याची परंपरा चालत आलेली आहे. याही वर्षी ५१ वा सामुदायीक दसरा महोत्सव म्हणजेच सुवर्ण महोत्सवी दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवाचे स्वागताध्यक्षपदी आ. रामेशअप्पा कराड यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी जयप्रकाश दगडे शहराध्यक्षपदी ईश्वर बाहेती व ग्रामीण अध्यक्षपदी प्रदीप पाटील खंडापुरकर यांची निवड करण्‍यात आलेली आहे.

          प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सामुदायीक दसरा महोत्‍सव मोठया उत्‍साहात साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने वैजनाथअप्‍पा लातूरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत लातूरच्‍या सामुदायीक दसरा महोत्‍सवाचा यावर्षी सुवर्णमहोत्‍सव असल्‍याने व्‍यापक स्‍वरूपात महोत्‍सव साजरे करण्‍याचे सर्वानुमते निश्चित करण्‍यात आले.  विविध पदाधिका-यांच्‍या एकमताने निवडी जाहीर करण्‍यात आल्‍या. त्‍यानूसार या महोत्सवाच्‍या स्वागताध्यक्षपदी आ. रामेशअप्पा कराड यांची निवड करण्यात आली आहे तर शहराध्यक्षपदी ईश्वर बाहेती व ग्रामीण अध्यक्षपदी प्रदीप पाटील खंडापुरकर, कार्याध्यक्षपदी जयप्रकाश दगडे आदीसह अनेकांच्‍या निवडी करून त्‍यांच्‍यावर जबाबदारी देण्‍यात आली.

या वर्षी सुवर्ण महोत्सवी दसरा महोत्‍सव असल्याने ग्रामीण भागातील जनतेला या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी प्रथमच ग्रामीण आणि शहर विभाग निर्माण करून शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बाहेती यांची तर ग्रामीण अध्यक्षपदी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापुरकर यांची निवड करण्यात आली तर मुख्य संयोजकपदी श्रीकांत रांजणकर कार्याध्यक्षपदी जयप्रकाश दगडे तसेच शहर प्रमुख संयोजक संतोष तोष्णीवाल संयोजक अॅड. विजयकुमार सलगरे सरचिटणीसपदी व्यंकटेश हालिंगे उपाध्यक्ष अॅड. गोपाळ बुरबुरे, रमाकांत बुरबुरे, सुरेश गोजमगुंडे, दगडूसाहेब पडिले, गुरुनाथ मग्गे, वनश्री मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गोजमगुंडे, आर्य समाज लातूरचे ओमप्रकाश पाराशर भारत माळवदकर, शंकरराव मोरे, हणमंत कोळेकर, राजेंद्र दिवे, अशोक पवार, दयानंद 'भालकीकर, वैजनाथ हालींगे, बाबू आप्पा सोलापुरे इत्यादिची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्षपदी विष्णुजी भुतडा, दिलीप कानगुले यांची निवड करण्यात आली. ग्रामीण प्रमुख संयोजक नीलकंठ साळुंके पाटील, महादेव खंडागळे, अभंग कांबळे, लक्षमन हाडगीकर, गोविंद जाधव, विजय माने यांची निवड करण्‍यात आली. महिला दसरा युवती अध्यक्षपदी अॅड. राणीताई स्वामी, उपाध्यक्ष योगिताताई ठाकूर, कार्याध्यक्ष सुवर्णाताई नाईक, सचिव शीतलताई तम्मलवार, संघटक श्‍वेताताई परदेशी, सहकार्याध्यक्ष प्रितीताई कोळी, सहसंघटक मीनाक्षीताई दोरवे इत्‍यादी.

दसरा युवक अध्यक्षपदी आकाश गडगिळे, संयोजकपदी शिवराजअप्पा पानगावे, संयोजक नितीन मोहनाळे, कार्याध्यक्ष अजय राठोड, कायदेशीर सल्लागार मंडळाचे मुख्य संयोजक अॅड. विजयकुमार सलगरे, संयोजक अॅड. दिपक बनसुडे, अॅड. अभिषेक बुके, अॅड. सतीश भालेराव, अॅड. योगेश बनसुडे, इत्यादींची निवड करण्यात आली. प्रसीद्धी समिती प्रमुख दयानंद जडे, विनोद चव्हाण, बालाजी गाडेकर, महेश गाडेकर, मुख्य संघटक अमोल नान्नजकर, संघटक संदीप पुणेकर, मिरवणूक समिती प्रमुख ओम गोपे, बाळासाहेब रेड्डी, महादेव कानगुले, अभिषेक पतंगे, राजाराम ठाकूर, मिरवणूक संयोजक राजेंद्र वनारसे, दत्ता सुरवसे, सुभाषप्पा सुलगुडले, बालाजी शेळके, महावीर काळे, रमाकांत बुरबुरे, दासराव पाटील, हर्षवर्धन आकनगिरे, राजेंद्र दिवे, आनंत लोखंडे रमेशवर राउत, किशनराव राउत, इत्‍यादींची निवड करण्यात आली.
ग्रामीण युवा अध्यक्ष तुषार रेड्डी, श्रावण रावणकुळे उपाध्यक्ष, आदित्य कसले संयोजक नेताजी जाधव सरचिटणीस, राम पवार सह सचिव, दीपक भारती, संयोजक, वैभव मिश्रा शहर युवा संयोजक इत्यादींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या प्रसंगी बैठकीचे अध्यक्ष वैजनाथअप्पा लातुरे यांनी दसरा मोहत्‍सव यशस्‍वी करण्‍यासंदर्भात सविस्‍तर मार्गदर्शन केले व सर्व निवड झालेल्या पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीचे प्रास्ताविक व्यंकटेश हलिंगे यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप कानगुले यांनी केले शेवटी मुख्य संयोजक श्रीकांत रांजणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم