कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहाय्यक पदासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कंत्राटी क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहाय्यक पदासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            लातूर-   आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत जिल्हास्तरावर कृषी व अन्न प्रक्रिया संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी लातूर जिल्ह्याकरिता एक क्षेत्रिय अधिकारी (फिल्ड लेवल ऑफिसर) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) या कंत्राटी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी 10 ऑक्टोबर,  2023 रोजी सायंकाळी 6 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

           क्षेत्रीय अधिकारी (फिल्ड लेवल ऑफिसर) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रकिया) या पदासाठी शैक्षणिक आर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळविलेली पदवी (अनिवार्य) बीएससी (ॲग्री / हॉर्टी), बीटेक (फुड / ॲग्रो) अनिवार्य आहे. पदव्यत्तर एमबीए (अनुक्रमे प्रधान्य फायनान्स, प्रोड्युक्शन मॅनेजमेंट, बिजनेस) एमटेक (फुड), एमएससी (ॲग्री, हॉर्टी, फुड) असा प्राधान्यक्रम राहील. एमएससीआयटी अनिवार्य असून संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक आहे. इंग्रजी, मराठी टायपिंग येणे अनिवार्य आहे. किमान अनुभव किमान 2 वर्षे आवश्यक असून मासिक मानधन 28 हजार 800 प्रति महिना राहील.
            या पदासाठी आवश्यक अर्जाच्या अटी व शर्तीनुसार कृषि विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने कलेक्टर ऑफिस शेजारी, दुसरा मजला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लातूर येथे अर्ज सादर करावेत.
            अर्ज करण्यासाठी अंतिम 10 ऑक्टोबर, 2023 संध्याकाळी 6-00 वाजेपर्यंत आहे. तसेच विहीत कालावधीत या पदासाठी अर्ज प्राप्त न झाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم