आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी
देवणी-भारत देशासाठी ज्या थोर महापुरुषांनी मोलाचे योगदान दिले असे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेज देवणी येथे दि.02 ऑक्टोंबर 2023 रोजी विविध उपक्रम घेवून  कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य राहुल बालुरे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे व उप प्राचार्य रामदास नागराळे यांच्या हस्ते लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लीड को ओर्डीनेटर क्षेमानंद कन्नाडे व रणजीत गायकवाड आणि वस्तीगृह अधीक्षक मंजुनाथ कन्नाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य राहुल बालुरे यांनी लाल बहाद्दूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश अंबनगरे व आभार उमाकांत पवार यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم