गावठाण जागेवरील वरील अतिक्रमण नियमित करण्याची रिपाईची मागणी

गावठाण जागेवरील वरील अतिक्रमण नियमित करण्याची रिपाईची मागणी

देवणी/प्रतिनिधी- तालुक्यातील  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका देवणी जिल्हा लातूर यांच्या वतीने मौजे बोळेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथील गावठाण जागेवर दलित समाजाच्या वतीने करण्यात आलेले अतिक्रमण नियमित करण्यात यावे या मागणीसाठी देवणी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले,सदरील निवेदनात मौजे बोळेगाव तालुका देवणी येथील बोळेगाव-आनंदवाडी रस्त्यालगत असलेल्या गावठाण जागेवर गेल्या अनेक वर्षापासून दलित समाजाचे वास्तव्य आहे परंतु अद्यापही त्यांना त्या जागेची कायदेशीर मालकी देण्यात आलेली नाही शिवाय त्या जागेवर आता कुठल्यातरी मोबाईल कंपनीकडून टॉवरची उभारणी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले ते काम तात्काळ थांबवण्यात येऊन गावठाण धारकांना त्या जागेची कायदेशीर मालकी देऊन हे अतिक्रमण नियमित करण्याची मागणी करण्यात आली तसेच नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांना निवेदन देण्यात आले,आमच्या मागण्या मान्य न झाल्यास अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष गणेश कांबळे दवणहिप्परगेकर यांनी दिला, यावेळी सरचिटणीस धनराज गायकवाड,सचिव पुष्पक सूर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष बालाजी सोनवणे वलांडीकर,विठ्ठल गायकवाड, वैजनाथ कांबळे, सह रिपाई पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم