आलमला :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथील तीन विद्यार्थ्यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक येथे संपन्न झालेल्या IFSK9 मराठवाडा ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत श्रीमान अजित ढोले यांनी आयोजीत केलेल्या स्पर्धेत 2 गोल्ड व 1सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. त्यात प्रशांत कुंभार( 13 वर्ष )वयोगट (गोल्ड मेडल), सौरभ बोकडे (14वर्ष) वयोगट (गोल्ड मेडल) व स्वामी सोहम (12 वर्ष) वयोगट (सिल्वर मेडल) असे घवघवीत यश प्राप्त करून राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल विद्यालयात या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक श्री सारगे सर, क्रीडा शिक्षक श्री रंगनाथअंबुलगे यांचे संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमाशंकर पाटील, उपाध्यक्ष शिवाजीराव अंबुलगे, सचिव प्रभाकर कापसे, सहसचिव नंदकिशोर धाराशिवे, कोषाध्यक्ष चनबसप्पा निलंगेकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, पर्यवेक्षक पी.सी. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
रामनाथ चे कराटे स्पर्धेत यश
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق