फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट,एकाचा मृत्यू तर सात लहान मुले गंभीर जखमी

फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट,एकाचा मृत्यू तर सात लहान मुले गंभीर जखमी
लातूर -फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट..
एक ठार ..सात लहान मुले गंभीर जखमी 
लातूर शहरातील धक्कादायक घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे जखमी वर उपचार सुरू तावरजा कॉलनी भागातील धक्कादायक प्रकार
गाडीचा झाला चक्काचूर… फुगे विक्रेत्याच्या जागीच मृत्यू शहरातील तावरजा कॉलनी भागात आज संध्याकाळच्या वेळेला धक्कादायक घटना घडली आहे. गॅसचे फुगे विकणारा एक व्यक्ती त्याच्या दुचाकीसह तावरजा कॉलनी भागात आला होता. त्या व्यक्तीच्या एम ए 80 या वाहनावर गॅस सिलेंडर होता. चार ते आठ या वयोगटातील जवळपास सात ते आठ मुले यावेळी तेथे हजर होती..अचानक यावेळी सिलेंडरचा स्फोट झाला… प्रचंड मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेली लोक भयभीत झाली होती.या स्फोटात फुगे विकणारा इसम जागीच ठार झाला आहे. जवळपास आठ लहान मुले या स्फोटाच्या धक्क्यात सापडली ..यातील दोन मुलांना अतिशय गंभीर इजा झाली आहे..इतर सात मुलं ही तीव्र दुखापत ग्रस्त झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुधाकर वावकर आणि त्यांचे दोन पथके इथे दाखल झाली. तात्काळ रुग्णवाहिकेंना पाचारण करण्यात आलं. जखमी लहान मुलांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळेस आठ पेक्षा जास्त लहान मुले दवाखान्यात आल्याकारणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा कामाला लागली होती. डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या लहान मुलांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेत मूर्त पावलेला फुगेवाला हा सातत्याने लातूर शहरात गॅस वरची फुगे विकताना दिसत होता. त्या मृत्यू व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेलं नाही… प्राथमिक माहिती अशी आहे की तो आंबेजोगाई या भागातून लातूर शहरात फुगे विकण्यासाठी येत असतो. त्याच्या एम ए 80 या गाडीवर शहरातील विविध भागात जात गॅसवरची फुगे तो विकायचा व्यवसाय करत होता. या स्फोटामध्ये गाडीचा अक्षरशः चक्का चूर झाला असून फुगे विकणारा व्यक्ती जागेवरच मृत्यूमुखी पडला आहे.
स्फोटाचा आवाज इतका तीव्र आणि भयानक होता की आजुबाईच्या परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं. तावरजा कॉलनीतील अरुंद गल्लीमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती.अरुंद गल्ली आणि स्फोटाचा तीव्र आवाज यामुळे या परिसरातील अनेक घरातील लोक रस्त्यावर आले होते.

Post a Comment

أحدث أقدم