कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कवितांचा आनंद

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कवितांचा आनंद मुरूम(प्रतिनिधी) : येथील बसव सहकार भवनमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयामार्फत कोजागिरी काव्य मैफिलचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निर्मळे, प्रा. शिवाजी राठोड, विनोद कुलकर्णी, संचालक अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. विविध घटना, प्रसंग, कल्पतेवर  आधारित यावेळी कविवर्य रुपचंद ख्याडे यांनी स्वर्गातील अर्थकारण.....
" स्वर्गात झाला एकदा
मोठा आर्थिक घोटाळा 
कुबेराचा खजिना ही
संपला हो सगळा
इंद्रदेव सर्व देवांना बोलले
पृथ्वीवर जा देवपण सोडून
कर भरण्याचे तंत्रज्ञान
शिकून या 
भारतीयाकडून "......
अमोल कटके यांनी
नेहमीच अचूक नसतं कोणी...., सहशिक्षक नागनाथ बदोले यांनी
राजा रयतेचा वाली
त्यांनी इतिहास घडविला...., हुसेन नुरसे यांनी
गणपती स्तवन व महंमद  रफी यांचे गीत, संत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांनी
माणसा तू माणूस बन...., पत्रकार अजिंक्य मुरुमकर यांनी
सबके हिस्से में नहीं आता...., प्रा. विश्वजीत अंबर यांनी कॉलेजचे गेट झाली तेथे भेट..., नितीन डागा यांनी ये राते, ये मौसम, नदी का किनारा...., डॉ. महेश मोटे यांनी मुरूमकर...., शिवशरण वरनाळे यांनी
नजर.... तर तंत्रस्नेही सहशिक्षक सुनिल राठोड यांनी झाड कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. याप्रसंगी प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, आनंद बिराजदार, पृथ्वीराज गव्हाणे आदिंची विशेष उपस्थिती होती. शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, धीरज मुदकण्णा, सचिन कंटेकूरे, राजू मुदकण्णा, महांतय्या स्वामी, संतोष मुदकण्णा, गुंडेराव गुरव आदींनी पुढाकार घेतला. या काव्य मैफिलचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी भोसले तर आभार अशोक जाधव यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم