भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते रेणापूर येथील माती दिल्लीच्या अमृतवाटिकेसाठी रवाना
लातूर - देशाच्या अमृत महोत्सव निमित्ताने पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सूचनेनुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत रेणापुर शहरातील सर्वच प्रभागातून गोळा करण्यात आलेली माती एका कलशातून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभ हस्ते दिल्ली येथे होणाऱ्या अमृतवाटिकेसाठी रविवारी पाठविण्यात आली.
देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या जवळ निर्मित होणाऱ्या अमृतवाटिकेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० मातीचे कलश आणले जाणार आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत या वचन पद्धतीचे प्रतीक असलेल्या अमृतवाटिकेची निर्मिती केली जाणार आहे.
माझी माती माझा देश या अभियानांतर्गत रेणापूर शहरातील सर्वच प्रभागातून गोळा करण्यात आलेल्या मातीचा कलश भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते दिल्लीसाठी विधिवत पूजा करून रवाना करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, गटविकास अधिकारी सुमित जाधव, भाजपाचे विक्रमकाका शिंदे, महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, वसंत करमुडे, सतीश आंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण अभियानाची माहिती रेणापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांनी उपस्थितांना दिली. प्रारंभी प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
रेणुका देवी मंदिर परिसरात रविवारी झालेल्या या कार्यक्रमास भाजपाचे दत्ता सरवदे, श्रीकृष्ण जाधव, विजय गंभीरे, सचिन चेवले, चंद्रकांत कातळे, श्रीकृष्ण पवार, भागवत गीते, गोपाळ शेंडगे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, अमर चव्हाण, शिवमुर्ती उरगुंडे, शिला आचार्य, माधव गुडे, उत्तम चव्हाण, गणेश तूरूप, रमाकांत संपत्ते, संतोष चव्हाण, उज्वल कांबळे, अच्युत कातळे, राजू आलापुरे, अंतराम चव्हाण, शेख अजीम सुरेश बुड्डे, रमा चव्हाण, लखन आवळे, हनुमंत भालेराव, दिलीप चव्हाण, संतोष राठोड, गणेश माळेगावकर, नगर पंचायतीचे मंगेश देशमुख, विशाल विभुते, अभिजीत धायगुडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق