विविध उपक्रमातील सहभाग हा बालकांच्या व्यक्तिमत्त्वासाठी उपयुक्त-प्रा. डॉ. महेश मोटे

विविध उपक्रमातील सहभाग हा बालकांच्या व्यक्तिमत्त्वासाठी उपयुक्त-प्रा. डॉ. महेश मोटे
मुरुम : स्पर्धात्मक युगात बालकांना टिकायचे असेल तर शैक्षणिक उपक्रमासोबतच विविध सुप्त कला गुण अंगी बाळगले पाहिजेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन, लेखन व विविध कला-कौशल्य आत्मसात होणे गरजेचे आहे. त्यासाठी बालकांचा विविध प्रकारच्या शालेय स्तरावरील स्पर्धेतील सहभाग वाढला पाहिजे. याकरिता पालकांनीही आपल्या पाल्याचा सहभाग वाढला पाहिजे. शिक्षकांनी त्यांना विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून प्रोत्साहित करणे  गरजेचे असून विविध उपक्रमातील सहभाग हा बालकांच्या व्यक्तिमत्त्वासाठी उपयुक्त असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
उमरगा तालुक्यातील मुरुम येथे प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मुरुम येथे रंगोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ सोमवारी (ता. १६) रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका ए. व्ही. जोशी होत्या. प्रारंभी विद्येची देवता सरस्वती व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. महेश मोटे व सेवानिवृत कलाशिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिवेक्षक एस. टी. अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, संगमेश्वर लामजणे, रंगोत्सव प्रमुख अश्विनी क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रंगोत्सव स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन यश संपादन केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, ट्रॉफी, मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज हळळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोनाली कारभारी, प्रभावती कलशेट्टी व गीता सत्रे यांनी  तर आभार सरस्वती जाधव यांनी मानले. यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم