भूलथांपांना बळी न पडता शेतकरी हित जपण्यासाठी कारखान्यास ऊस द्या - चेअरमन गणपती बाजूळगे

 भूलथांपांना बळी न पडता शेतकरी हित जपण्यासाठी कारखान्यास ऊस द्या - चेअरमन गणपती बाजूळगे


औसा : प्रतिनिधी-भूलथांपांना बळी न पडता शेतकरी हित जपण्यासाठी शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यास ऊस द्या असे आवाहन चेअरमन गणपती बाजूळगे यांनी केले. संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सन २०२३ -२४ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम ह.भ.प.महेश महाराज, माकणीकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

चेअरमन बाजूळगे म्हणाले की, शेतकरी विकास व आर्थिक हित हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा कारखाना वाटचाल करीत असून यामुळे कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतक-याना मोठा दिलासा मिळाला आहे. गाळप क्षमता वाढविल्यांने हा कारखाना यंदाच्या गळीत हंगामात ३ लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक ऊस गाळप पूर्ण क्षमतेने करणार असल्याचे चेअरमन बाजुळगे यावेळी म्हणाले. मागील हंगामात परिसरातील इतर कारखान्यापेक्षा अधिक भाव दिल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे औसा , बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भोसले राजीव कसबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पुर्वी होमहवन पुजा विधी संचालक श्री व सौ विलास व्यंकटराव शिंदे पाटील यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, संचालक सचिन पाटील, शामराव साळुंके, विलास पाटील, सुरेश भुरे तसेच ऊसउत्पादक सभासद शेतकरी अधिकारी चिफ इंजिनिअर सुनिल पवार, चिफ केमिष्ट आण्णासाहेब मोरे, मुख्य शेतकी अधिकारी, शाम शिंगारे, गोपाळ चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत सावंत यांच्यासह कर्मचारी व कामगार उपस्थित होते. प्रस्ताविक सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बारमदे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم