भोपणीकर परिवाराच्या दीपावली फराळानिमित्त अशोकराव पाटील निलंगेकर यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद

भोपणीकर परिवाराच्या दीपावली फराळानिमित्त अशोकराव पाटील निलंगेकर यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद

देवणी - देवणी तालुका काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत भोपणीकर परिवारातर्फे आयोजित केलेल्या दीपावली फराळानिमित्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपनीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,माजी जि.प.सदस्य सुरेंद्रजी धुमाळ, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,लहूजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष गोविंदजी सूर्यवंशी,औराद काँग्रेसचे शहरअध्यक्ष हाजी सराफ,देवणी निराधार कमिटीचे मा.अध्यक्ष वैजिनाथ लुल्ले,प्रा.सुनील पाटील  रेवण बदुरे, विकास पवार, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गजानन भोपणीकर यांची सोलापूर शहर युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सुसंवाद कार्यक्रमांमध्ये बोलताना गोविंदराव भोपनीकर म्हणाले की, येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत अशोकराव पाटीलच आमदार होणार असे म्हणत त्यांनी  या ९ वर्षात मतदार संघात कोणतेही कामे झाली नसून काँग्रेस काळात झालेल्या कामाचे उद्घाटन सध्याचे आमदार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. व अशोक भैय्यांनी सीमेवरील देवणी तालुक्याला निलंगापेक्षा जास्त वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी केली. तर अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, या मतदारसंघाला आदरणीय निलंगेकर साहेबांनी या निलंगा मतदारसंघाचा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केलेला आहे.या जिल्ह्याचे नावलौकिक स्व.डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, स्व.विलासरावजी देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांनी विकासकामाच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे. पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष मजबूत करून या जिल्ह्याचा खासदार हा काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे व आमदार पण काँग्रेसचाच झाला पाहिजे मला दोन वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले परंतु तुमचा आशीर्वाद व सहकार्य लाभले तर मी मुंबईच काय दिल्लीसुद्धा सर करेन डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शिकवण दिलेली आहे राजकारणामध्ये जय पराजय होत असतात त्याची तमा न बाळगता सामाजिक कार्य केले पाहिजे. यावेळी संबंधित कार्यक्रमाच्या जोरावर ते म्हणाले की,"अभी नही तो कभी नही"अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी निलंगा तालुका सोशल मीडियाचे प्रमुख ज्ञानेश्वर वाडीकर,बोरोळचे प्रताप कोयले, कृष्णा पाटील,मा. नगरसेवक देविदासजी पतंगे, धनेगावचे पुंडलिकजी बिराजदार,वलांडीचे रामभाऊ भंडारे, देवणीचे नगरसेवक मळभागे, धनराज रंगराव टेकाळे,   अंकुश माने, रतन गरड, पांडुरंग बिरादार, कृष्णा पाटील, अनिल पाटील,अनंत बिरादार, दिलीप बिरादार, सुरेश चिंचोले, राम बिरादार प्रशांत घोलपे सुभाष संग्राम माने, काँग्रेसचे सचिव रशीद मिया मल्लेवाले, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,मा. सरपंच बालाजी बिराजदार, गोविंदराव बिरादार, चेअरमन अंकुश बागवाले,ज्ञानेश्वर भागवत शिंदे, अरुण गिरी, भालचंद्र भोसले, विशाल पंढरपुरे,पटेल मेहमूद,कृष्णा मुराळे,पवळे बालाजी, खुडे दयानंद, माधव बालुरे पाटील, दशरथ कांबळे,रतन गरड, रतन  बिरादार,संगमेश्वर मिरचे पाटील, जगताप दत्तात्रय, लक्ष्मण शिराळे, बालाजी बिरादार गुनाले,बाबुराव तुकाराम, रामदास माधव कांबळे,भरत शिंदे,परीक्षित शिंदे, गजानन लांडगे,व्यंकटराव बिरादार,संतोष लांडगे, सुधीर लांडगे,माटेगाडीचे भगवान सावंत,सचिन हसन,देवणीचे नगरसेवक मळभागे,गटनेते तांबोळी,नगरसेवक अमित सुर्यवंशी इ. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم