महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नौकर भरतीत भूकंपग्रस्तांना पूर्ण कोटा द्यावा-संतोष भाऊ सोमवंशी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नौकर भरतीत भूकंपग्रस्तांना पूर्ण कोटा द्यावा-संतोष भाऊ सोमवंशी
लातूर: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण  कंपनीच्या दिनांक 20/11/2023 रोजी च्या जाहिरातीत भूकंपग्रस्तांना 2 टक्के कोट्यानुसार आरक्षण कोटा पूर्ण केला नाही तरी भूकंपग्रस्तांना 2 टक्के कोट्यानुसार पूर्ण जागा देऊन जाहिरात पुर्नप्रकाशित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित सेवा योजना जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत 20/11/2023 रोजी मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) यांच्या अधिकारात करण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाच्या जाहिरातीत 1903 पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात भूकंपग्रस्तांसाठी लागू असलेल्या 2 टक्के आरक्षण अंतर्गत फक्त 6 जागा देण्यात आल्या आहेत.हा भूकंग्रस्त उमेदवारावर अन्याय आहे. सदरील जाहिरात भूकंग्रस्तासाठी राखीव असल्यास 2 टक्के कोट्याप्रमाणे 38 जागांसह पूर्णप्रकाशित करावी. प्रशासनाच्या वतीने भूकंपग्रस्त उमेदवारावर अन्याय वारंवार होत आहे.अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने भूकंपग्रस्त उमेदवारावर सहानुभूतीपूर्वक विचार करत तात्काळ ती जाहिरात स्थगित करत भूकंग्रस्ताच्या 2 टक्के पूर्ण कोट्यासह पूर्णप्रकाशित करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم