शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
 लातूर - रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आज वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटक म्हणून रॉयल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष एल. एम. पाटील उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विप्रो कंपनीचे ग्लोबल सेल्स हेड अमोल शेळके, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष अण्णासाहेब यादव-पाटील, शारदा इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य डी. एम. घारगे. शारदा सेमी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एल. टी. पुरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मशाल ज्योत घेऊन मैदानावर संघातील एकता दाखवली व ध्जारोहण करून क्रीडा महोत्सवास सुरुवात करण्यात आली. खेळाचे महत्त्व सांगणारे नृत्य प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
खेळामुळे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच निर्णयक्षमता, सहानुभूती, सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, असे प्रतिपादन शेळके यांनी केले. यावेळी प्राचार्य पुरी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास शालेय स्तरावरच होतो. यासाठी अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे काळाची गरज आहे.
प्रास्ताविक मुख्य समन्वयिका अनघा पाटील यांनी तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख दर्शना देशमुख यांनी केले. आभार समन्वयिका मानसी पाटील यांनी मानले. यावेळी समन्वयक रोहित जाधव, समन्वयिका अश्‍विनी पवार, रेणुका समुद्रे, क्रीडा शिक्षक बालकिशन देवडे, शिक्षक समरजीत ढगे, लिंबराज गायकवाड, क्षीरसागर, शिक्षिका साधना भेटे, रोहिणी कदम, उषा गुडदे, खमरुनिसा शेख, मीनाक्षी सूर्यवंशी, ऐश्‍वर्या बागल, प्रियल गोखले, अनिता रायमल, वैष्णवी मुंडे, सुरेखा जटाळ, गीतांजली गिरी, वर्षा कांबळे, अफरीन दामटे, शीतल नडगिरे, अश्‍विनी सुनापे, मीरा जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم