मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहावे : राम मेकले

 मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहावे : राम मेकले 


लातूर : बीड जिल्ह्यातील घाटनांदूर  येथे येत्या दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या  मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या ४७ व्या तसेच बीड जिल्हा ग्रंथालय संघाच्या ४८ व्या संयुक्त वार्षिक अधिवेशनास मराठवाड्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले  यांनी केले आहे. 
                          घाटनांदूरच्या कृष्णाई मंगल कार्यालयात ग्रंथमित्र कै . अनंतराव चाटे साहित्य नगरीत हे अधिवेशन संपन्न होणार आहे.  त्याचप्रमाणे यावेळी ग्रंथमित्र नरहरीदादा शहाणे मंठेकर  यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांची ग्रंथतुलाही  करण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार  हे राहणार आहेत. याप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुधीर चाटे, बीडच्या जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ - मुंडे, आ. सौ. नमिता मुंदडा, आ. संजय दौंड, माजी आ. गंगाधर पटणे , जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शिवकन्या पिंपळे, विभाग ग्रंथालय संघ अध्यक्ष राम मेकले , सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, राजकिशोर मोदी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, अनिल सूर्यवंशी, सुभाष साबळे,आशिष ढोक, भिमराव  जीवने , सुधीर आचार्य, घाटनांदूरचे  सरपंच महेश गारठे , उपसरपंच सौ. उर्मिलाताई जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात  जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के व अनिल सूर्यवंशी यांना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
या अधिवेशनात ग्रंथालय शाळेच्या दारी उपक्रम, ग्रंथालय चळवळीसमोरील आव्हाने व उपाय या विषयावरील परिसंवाद होणार आहेत. तीन सत्रात पार पडणाऱ्या या अधिवेशनास मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत ग्रंथपाल, ग्रंथालयीन कर्मचारी, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष राम मेकले , प्रमुख कार्यवाह संतोष ससे, कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, अरविंद लंके - पाटील, यांसह  बीड जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم