हासेगाव फार्मसीचे प्राचार्य डॉ नितीन लोणीकर यांची नांदेड विद्यापीठात अभ्यास मंडळावर नियुक्ती.

 हासेगाव फार्मसीचे  प्राचार्य   डॉ नितीन लोणीकर यांची नांदेड विद्यापीठात अभ्यास मंडळावर नियुक्ती


          औसा (प्रतिनिधी ) :  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ नितीन लोणीकर यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मधील  फार्माकॉलॉजी ,टॉक्सिकोलॉजी ,फार्माकोग्नोसी  आणि क्वॉलिटी असुरन्स या   अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. 


           फार्मसी विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रम जसे कि, बी फार्मसी, एम. फार्मसी व फार्म डी . यांच्या  अभ्यासक्रम   तयार करणे . एम फार्मसी च्या विविध विषयांची समकक्षता ठरविणे . फार्मसी अभ्यासक्रमाबाबत फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया , महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिलेल्या विविध धोरणे लावू करणे . फार्मसी शिक्षण क्षेत्राशी निगडित विद्यापीठ प्रशासनास येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविणे अशा अनेक घटकावर अभ्यास मंडळ तरतूद करते  अशी माहिती संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी दिली . 

    त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे, सचिव श्री वेताळेश्वर  बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे , संचालक नंदकिशोर बावगे यांच्या हस्ते प्राचार्य   डॉ नितीन लोणीकर यांचे शॉल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 

          

तसेच  लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, राजीव गांधी पॉलिटेक्निक, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी  लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण , गुरुनाथअप्पा बावगे इंटरनॅशनल स्कूल लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर ,ज्ञानसागर विद्यालय हासेगाव या सर्व विद्यालय व महाविद्यालयाचे  प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी  प्राचार्य   डॉ नितीन लोणीकर यांचे अभिनंदन करून   पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

أحدث أقدم