त्रिलोकातील मानव हेच कुटुंब माणून कार्य करण्याची प्रेरणा देणारे अध्यात्म- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 त्रिलोकातील मानव हेच कुटुंब माणून कार्य करण्याची प्रेरणा देणारे अध्यात्म- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर -वैदिक काळापासून भारतीय अध्यात्माचा प्रसार ऋषिमुनींनी जगभर केला. कुठलीही जात पंथावरती आधारित मानवाचे कल्याण नसून त्यांच्या कर्तव्यावरती अवलंबून असल्याचे शिक्षण भारतीय अध्यात्माने दिले. मानवाचे कल्याण हे भौतिक साधनावरती अवलंबून नसून त्याचा आंतरविचारावरती अवलंबून आहे. हेच विचार अन्यायाविरूध्द लढण्याची, राष्ट्र व समाज निर्मितीची प्रेरणा देतात. हे विचार प्रत्येक तरूणांमध्ये रूजविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते साईसेवक प्रतिष्ठानच्यावतीने लातूर ते शिर्डी पदयात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला राधाकृष्ण मंदिर गातेगावचे ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज, शिवसेनेचे मा.जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, मा.नगरसेवक रविशंकर जाधव, साईसेवक प्रतिष्ठानचे श्री.दिनकर मुळे, फुलचंद कांबळवाड, जितेंद्र गुळवे, उदय पाटील, हणमंत सारगे, मिलींद आदमाने, प्रकाश सोनवणे, लक्ष्मण सूर्यवंशी, धिरज भैरूमे, अनंत बोयणे, गोविंद शेळके, नेताजी मस्के, गोविंद सोदले, श्रीरंग सारगे, अमोल कवरे, विकी सारगे, बद्रूके, लोकरे, दुनगावे आदींची उपस्थिती होती. यावेळी साईसेवक प्रतिष्ठानच्यावतीने ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज व माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, भारताची ओळख मधल्या काळात बदलली होती तीला पुन्हा जगासमोर प्रज्वलीत करण्याचे कार्य राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदांनी 18 व्या शतकात शिकागो येथील धर्मपरिषदेमध्ये करून दिली. त्यामुळे आज भारताचा गौरव वाढविण्याचे ऐतिहासिक कार्य देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदीजी करीत आहेत असेही माजी आ.कव्हेकर म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم