रेणाचा ऊसाला प्रति मे. टन २५०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता ऊसउत्पादकांच्या खात्यावर जमा

 रेणाचा ऊसाला प्रति मे. टन २५०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता ऊसउत्पादकांच्या खात्यावर जमा

रेणापूर : प्रतिनिधी-तालुक्यातील दिलीपनगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने दि. ३ ते २० नोव्हेंबर या दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपी ऊस दरापोटी अग्रीम उचल प्रति मे. टन २५०० रुपयांप्रमाणे दि. २३ नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

राज्यभर नावलौकिक असलेला रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याने १७ गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडून कारखान्याकडुन प्रत्येक हंगामात मराठवाड्यात जास्तीत जास्त ऊस दर देण्यात येत आहे. गळीत हंगाम २०२३-२४ चे गाळप दि. ३ नोव्हेंबर रोजी सुरु झाले असुन कारखाना विस्तारीकरणाचा पुर्ण क्षमतेने चालवुन कारखान्याने दि. २१ नोव्हेंबरअखेर १८ दिवसामध्ये ६१७९० मे. टन गाळप करुन ४२६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक व कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र राज्याचे माजी वौद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच लातूर ग्रामीणचे आमदार .धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपी ऊस दरापोटी प्रति मे. टन २५०० रुपयांप्रमाणे अग्रीम उचल अदा करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार दि. ३ ते २० नोव्हेंंबर या दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाला रेणा कारखान्याकडून एफआरपी ऊस दरापोटी अग्रीम उचल प्रति मे. टन २५०० रुपयांप्रमाणे दि. २३ नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. तरी ज्या ऊस उत्पादकांचा दि. ३ ते २० नोव्हेंबरदरम्यान ऊस गाळपास आला आहे, त्यांनी आपल्या बँक शाखेतून ऊस बिलाची रक्कम उचल करावी व ऊस उत्पादकांनी आपला ऊस जास्तीत जास्त रेणा कारखान्याकडे गाळपास पाठवावा, असे अवाहन कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन आनंतराव देशमुख व कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी केले आहे.




Post a Comment

أحدث أقدم