एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील
शेतकऱ्यांनी विविध बाबींसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
लातूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-2024 अंतर्गत फुलपिक लागवड, मशरुम उत्पादन, हरीतगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, टॅक्टर 20 एचपी, शेतकरी अभ्यास दौरा, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 23 लाख रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 3 लाख रुपये निधी प्राप्त झालेला आहे. याबाबींचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.व्ही. लाडके यांनी केले आहे.
अर्जासाठी महा-महाडीबीटीचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login किंवा http://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.
तरी सर्व इच्छूक शेतकऱ्यांनी महा-डिबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. लाडके यांनी केले आहे.
إرسال تعليق