लातूर,: जिल्ह्यातील औसा शहरात स्व.बापुजी यादवराव कोहकडे वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव धुरगुडे युवक व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन प्रभाकर कापसे अध्यक्ष लातूर जिल्हा ग्रंथालय संघ लातूर यांच्या हस्ते व राजकुमार धुरगुडे उद्योजक व लेखक पुणे आणि रविंद्र कोहकडे डेप्युटी मॅनेजर व लेखक पुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक कमलाकर सावंत यांनी केले.तर प्रमुख पाहुण्यांनी यथोचित मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथीत ॲड सुभाष गायकवाड पुणे हरिश्चंद्र सुडे बुधोडा,शरद झरे माझं घर प्रकल्प प्रमुख यांनीही स्वागत गार्डनला संपन्न झालेल्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.
या वेळी राजकुमार धुरगुडे यांनी दहा दिव्यांग स्वावलंबी युवकांचा गौरव केला.अकरा गरिब गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले.या वाचनालय व केंद्राद्वारे दर रविवारी स्पर्धा परीक्षार्थींना आवश्यक पुस्तके व दरमहा युवक आणि शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे सोमनाथ काजळे यांनी सुत्रसंचालन केले.तर राजेश क्षिरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर सुर्यवंशी,सुरेश मोरे,राजेंद्र वाघमारे, बालाजी जोगदंड व एस आर बेळंबे ,चाबुकस्वार यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق