कुमारस्वामी महाविद्यालयीन कर्मचारी सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी प्रा.शिवराज मिटकरी निवड
औसा/प्रतिनिधी-शहरातील श्री कुमारस्वामी महाविद्यालयीन कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून दिनांक 20.02.2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कात्रे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी यांची निवडणूक बिनविरोध पार पडली.यामध्ये सोसायटीच्या अध्यक्ष पदी प्रा.शिवराज मिटकरी यांची निवड झाली तर सचिव म्हणून प्रा.किरण चौधरी, उपाध्यक्षपदी प्रा.संतोष तोडलगे, कोषाध्यक्ष म्हणून प्रा. जाम्बवंत कदम यांनी निवड करण्यात आली, यावेळी संस्थेचे नवनियुक्त संचालक प्रा.पटवारी,प्रा माने,प्रा. महावरकर, प्रा. पवार,प्रा.सौ.कांबळे, आदी.प्राध्यापक उपस्थित होते.
या निवडीबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज, सचिव गिरीश भैया पाटील, विश्वस्त तसेच, प्राचार्य डॉ.बेटकर व महाविद्यालयातील सहकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
إرسال تعليق