महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत  रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षण संपन्न
निलंगा/ प्रतिनिधी-शहरातील महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगा अंतर्गत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा महाविद्यालय आयक्यूएसी व एस्पायरिंग करिअर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एम्पलोयीबिलिटी स्किल्स ट्रेनिंग (Employability Skills Training)  दिनांक 14 मार्च ते 17 मार्च चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष  विजय पाटील निलंगेकर यांनी रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अस्पायरिंग करिअर्स, पुणे चे प्रोग्राम ट्रेनर डॉ. प्रिया जगताप मॅडम तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील होते. 
या कार्यक्रमाचे प्रोग्राम कॉर्डिनेटर प्रा. इरशाद शेख व कोकॉर्डिनेटर प्रा. सुशांत माचपल्ले, तसेच आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ.एस. व्ही. उसनाळे,  NAAC कॉर्डिनेटर डॉ. सी. व्ही. पांचाळ, प्रा. एस. व्ही. गरड, डॉ. एम. ए. शेटकार, डॉ. एस. पी. कुंभार,आदी. उपस्थित होते. रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षणात बी. फार्मसी व एम .फार्मसी च्या विद्यार्थ्यांना देहबोली (Body Language), व्यावसायिक शिष्टाचार (Professional Etiquette), बोलण्याची योग्य पद्धत (Grooming), सामर्थ्य आणि कमजोरी (Strength and Weakness), प्रभावी ऐकणे (Effective Listening), वाटाघाटी कौशल्य (Negotiating skills), वेळेचे व्यवस्थापन (Time Management), सादरीकरण तयार करणे (Creating Presentation), प्रेक्षकांसमोर सादर करणे (Presenting to an audience) आदी. विषयासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमात बी. फार्मसी प्रथम वर्षाचे 65 विद्यार्थी, द्वितीय वर्षाचे 79 विद्यार्थी व एम. फार्मसी चे 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व शेवटच्या दिवशी या सर्व 176 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रमाणित करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. इरशाद शेख प्रा.विनोद उसनाळे,प्रा.रविराज मोरे,  प्रा.सुरज वाकोडे, प्रा.प्रिती माकने ,प्रा.नंदा भालके,प्रा. शिवराज हुनसनाळकर,प्रा. सुजित पवार,प्रा. परवेज शेख,प्रा. सुशांत मतपल्ले, प्रा. सुमित बुये, सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. इरशाद शेख तर आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. गरड यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم