डी. एम. ज्युनिअर कॉलेज चे 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
लातूर : अवंती नगर, लातूर मधील डी.एम. ज्युनिअर कॉलेज लातूर चा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी कॉलेज ची यशाची परंपरा कायम राहिली आहे.
कॉलेज मधील विज्ञान शाखेच निकाल 100% लागला असून विज्ञान शाखेतून सर्वप्रथम राजुळे स्वयम (85%) द्वितीय शेख तुबतज्जिन (81%) तर तृतीय कोव्हाळे गौरव (77%) तर वाणिज्य शाखेचा 90% निकाल लागला असून वाणिज्य शाखेतून सर्वप्रथम भोसले संतोष (80%), द्वितीय दरेकर साक्षी (76%), तृतीय सुनके नेहा (72%) व कला शाखेचा निकाल 75% लागला असून कला शाखेतून सर्वप्रथम वाकळे प्रगती (64%), द्वितीय साळुंके पूनम (61%), आणि आरेराव सुनाक्षी (58%) व करदुरे प्रिती (58%) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कॉलेज मधील सर्व यशस्वी व गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्था सचिव श्री कालिदासजी माने, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज भैय्या माने, प्रशासकीय अधिकारी श्री जी. टी. माने, विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्या श्री विवेक भैय्या माने, साने गुरुजी शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व डी. एम. कॉलेजचे प्राचार्य श्री चव्हाण एस.एस. यांनी केले तसेच कॉलेज मधील सर्व प्राध्यापक श्रीमती सूर्यवंशी ए.डी. श्रीमती थोरात व्ही. एस. श्री कांबळे एस.व्ही., श्री बुरशे बी.एस., श्रीमती भोसले व्ही.ए., श्री माळी बी. के., श्रीमती बोधणे एस.बी., श्रीमती शेख एस.ए., श्रीमती माने एस.बी., श्री बामणकर पी.सी., आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री पवार डी. के. श्री जाधव एस.एम., श्री जाधव डी.जे., श्री पांचाळ दिग्विजय, श्री सुडे आर.पी., श्री हेडे ए.एस. यांनी ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
إرسال تعليق