बळी काशिनाथ पवार अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ च्या लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड
लातूर /प्रतिनिधी. औसा तालुक्यातील एक उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते बळी काशिनाथ पवार याची शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ प्रदेश सरचिटणीस मनोज पवार साहेब. व महिला प्रदेश सरचिटणीस कविता ताई बडूरे तथा रेश्मा ताई होळकर. बालाजी भोंग पाटील. मारुती जाधव. गोविंद पाटील. महादेव पवार. नवनाथ भोसले. समाधान लोखंडे. विठ्ठल लंगर. उमाकांत यादव. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवराच्या हस्ते तथा शिवसेना या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. लातूर येथील अखिल भारतीय शिव उद्योग सेना महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्त्याच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच बाळासाहेबांना अपेक्षित असलेले हिंदुत्ववादी विचार समाजामध्ये रुजऊन. शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचता कराल अशी अपेक्षा प्रदेश सरचिटणीस मनोज पवार.यांनी व्यक्त केली. संभाव्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका विचारात घेता बळी पवार यांचा दांडगा जनसंपर्क आणि संघटक कुशलता निश्चितपणे पक्ष संघटनेला फायद्याचा ठरणार आहे. या निवडीबद्दल बोलताना बळी पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याचे भान आणि जाण ठेवून मी काम करेन. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची उकल व्हावी. म्हणून मी सदैव अग्रेसिव राहीन. मी माझ्या कार्यातून अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ शिवसेना या पक्षाची प्रतिष्ठा वाढेल असेच काम करेन. असा विश्वास व्यक्त केला.
إرسال تعليق